"लालूपुत्र म्हणतो होय, मला स्वप्नात श्रीकृष्ण दिसले! यापूर्वी मुलायमसिंह दिसले!"

    23-Mar-2023
Total Views | 88
tej-pratap-yadav-video-dream-mahabharat-shri-krishna


नवी दिल्ली
: बिहार सरकारमधील मंत्री लालू प्रसाद यादव यांचा मोठा तेज प्रताप यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी तेज प्रताप यांनी दि.२२ मार्च रोजी ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओत त्यांना भगवान श्रीकृष्णाचे दर्शन स्वप्नात झाले , असा दावा करण्यात आलेला आहे. तसेच स्वप्नात श्रीकृष्णाचे विशाल रूप पाहून तेज प्रताप यांना धक्का बसतो आणि ते जागे होत असल्याचे पाहायला मिळते.
 
तेज प्रताप यांनी व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मला स्वपनात मुकुटाने सजवलेले चक्र आणि गदाने सुसज्ज असलेल्या सार्वत्रिक तेजस्वी अशा श्राकृष्णाचे दर्शन झाले. तसेच सर्व दिशांमधून निघणार्‍या सूर्यप्रकाशाप्रमाणे या तेजस्वी अग्नीत तुझा महिमा पाहणे कठीण आहे, असे ही त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.




या सर्व प्रकरणावर नेटकऱ्यांनी तेज प्रताप यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे. आणि यामुळे तेज प्रताप चेष्ठेचा विषय बनले आहेत. यापूर्वी दि. २२ फेब्रुवारी रोजी तेज प्रताप यादव यांच्या स्वप्नात मुलायमसिंह यादव आले असल्यांचा दावा त्यांनी समाजमाध्यमावर केला आहे. त्यावेळी त्यांनी लिहले होते की, मला स्वप्नात दिवंगत मुलायम सिंहजी दिसले. त्यांनी मला मिठी मारली आणि प्रेमाने आशीर्वाद दिला. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आयुष्यभर चालण्याचा मी प्रयत्न करेल.



अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..