राहुल गांधींनी सावरकरांचा पुन्हा केला अवमान; फडणवीसांनी सुनावले!

    23-Mar-2023
Total Views | 97
 
Devendra Fadanvis
 
 
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या अवमानकारक विधानाचे गुरुवारी विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. गांधींनी सावरकरांचा पुन्हा अवमान केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. शिवाय, आमदार संजय शिरसाट, भाजप नेते आशिष शेलार यांनीही हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.
 
फडणवीस म्हणाले, " स्वातंत्र्यवीर सावरकर एक थोर समाजसुधारक. ज्यांनी या देशामध्ये सर्व जातीपातींच्या बंधनाच्या पुढे जाऊन सर्व जाती प्रवेश करता येईल असं पहिलं मंदिर या देशात बांधण्याचं काम कोणी केलं तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. वयाच्या चौदाव्या वर्षी क्रांतिकार्याची प्रतिज्ञा घेतली लंडन मध्ये जाऊन ब्रिटिशांच्या छाताडावर बसून त्याठिकाणी क्रांतिकार्य केलं. इंडिया हाऊस मध्ये राहून ज्यांना दोन दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. अशा महाराष्ट्राच्या थोर सुपुत्राचं आपण आपल्या विधिमंडळामध्ये तैल चित्र लावलेलं आहे. आणि अशा महापुरुषाचा वारंवार जाणीवपूर्वक अपमान कोण करतंय? तर ज्याला दोन वर्षाची गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली. जे जामिनावर हिंडतायेत."
 
 
 
 
 
"सावरकरांचा वारंवार अपमान हे काँग्रेसवाले करत आहेत. आणि हे लोकं ते त्यांना समर्थन देत आहेत. यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांनी संत तुकारामांचा अपमान केला यांनी आमच्या सगळ्या विभूतींचा महात्मा फुलेंचा अपमान केला त्यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन प्रवृत्तीनी याठिकाणी बोललं जातं ते बोलणं देखील पहिल्यांदा बंद केलं पाहिजे कारण सावरकरांनी जे भोगलंय ते कोणीच भोगलेलं नाहीये."
 
"सावरकर अंदमानच्या कारागृहामध्ये अत्याचार सहन करत होते. तरी वंदे मातरम म्हणत होते. भारत माता की जय म्हणत होते. अनेक लोकं मृत्युमुखी पडले. अनेक लोकं त्याठिकाणी अक्षरशः वेडे झाले. पण सावरकरांनी त्याठिकाणी ते सहन करत त्याही ठिकाणी संघर्ष केला, आणि म्हणून भगतसिंगांनी देखील सावरकरांनी छापलेली जे आत्मचरित्र होतं त्यावेळी मासिकचं ते तयार करून वाटण्याचं काम हे स्वतः भगतसिंगांनी देखील केलेलं आहे. हे इतिहासामध्ये नमूद आहे. आणि हे कोण आले? हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का? जे याठिकाणी सावरकरांवर बोलतात. सावरकरांच्या विरुद्ध बोलण्याचा निषेध झालाच पाहिजे. आणि म्हणून हा निषेध आम्ही याठिकाणी करतो." अशी स्पष्ट भुमिका फडणवीसांनी मांडली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121