लंडनमध्ये तिरंग्याचा अवमान करणार्‍याला अटक

    22-Mar-2023
Total Views |
vandalism-by-pro-khalistan-protestors-at-indian-high-commission-in-london

लंडन : पंजाबमध्ये अमृतपाल सिंग याच्यावर कारवाईचा निषेध म्हणून लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर तिरंग्याचा अवमान करणारा खलिस्तानी समर्थक अवतार सिंग खांडा याला अटक करण्यात आली आहे. खांडा हा प्रतिबंधित गट बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सदस्य आहे. तसेच पंजाबमध्ये सुरू असलेल्या तपासात खांडा हा अमृतपालचा हस्तक असल्याचेही निष्पन्न झाले आहे. लंडनमध्ये पकडलेला खांडा हा खलिस्तान लिबरेशन फोर्सशी संबंधित असलेला कुवंत सिंग खुराणा याचा मुलगा आहे.