अमृतपाल सिंग गेला कुठे?

गुप्तचर यंत्रणा घेताहेत कसून शोध

    22-Mar-2023
Total Views | 65
Amritpal Singh
 

मुंबई : ‘वारिस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या असणारा अमृतपाल सिंग पंजाबमधून फरार झाला आहे. पंजाबच्या ८० हजार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अमृतपाल गेला कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तो महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून देशभरातील गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत.खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग महाराष्ट्रात आश्रयाला आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्कता बाळगत आहेत.
 
गुप्तचर यंत्रणांच्या मते दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याच्यासोबत अमृतपालचे संबंध आहेत. पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत रिंदाचे मोठे नेटवर्क आहे. त्यामुळे अमृतपाल महाराष्ट्रात येण्याची शक्यता अधिक असल्याचे म्हटले जात आहे.अमृतपाल महाराष्ट्रातील ड्रग्स पेडलर्सच्या आश्रयाला आल्याचा दावा एका वृत्तसंस्थेने केला आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्र, नांदेड ते मुंबईपर्यंत आपली यंत्रणा कामाला लावली आहे. पाकिस्तानमधून सूत्र हलवणार्‍या आणि देशात ड्रग्स सप्लाय करणार्‍या हरिवंदर सिंह रिंदा याची अमृतपालला मदत होत असल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय हँडलरच्या माध्यमातून तो महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे. पाकिस्तानच्या इशार्‍यावर देशात ड्रग्सचा धंदा करणार्‍या लोकांच्या आश्रयाला अमृतपाल असल्याची शक्यता त्यामुळेच वाढली आहे.फरार अमृतपाल बहुरुपीअमृतपाल सिंगला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केले असून त्याचे सात वेगवेगळ्या रुपांमधले फोटो पोलिसांनी प्रसिध्द केले आहेत. अमृतपालने पुन्हा आपला चेहरा मोहरा बदलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने पुन्हा वेश बदलल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.पोलिसांना चकवा देण्यासाठी अमृतपाल सिंग वेगवेगळे वेश धारण करत असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे पंजाब पोलिसांसाठी सध्यातरी अमृतपाल सिंग गुढ ठरत आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121