इस्लामाबाद : पाकिस्तानातील आबोटाबादमध्ये पीटीआय या इमरान खान यांचा पक्षाच्या नेत्यावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. ज्यात १० जणांचा मृत्यू झाला. पीटीआय पक्षाचे आतिफ मुन्सिफ खान त्यांच्या वाहनातून जात होते. त्यांच्या वाहनाच्या इंधन टाक्यांवर गोळीबार झाला. त्यापूर्वी त्यांच्यावर रॉकेट हल्ला झाला. यामुळे वाहनांचा स्फोट झाला आहे. क्रिकेट खेळून परतत असताना हा हल्ला झाल्याची प्रार्थमिक माहिती आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.