खलिस्तानी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात येण्याची शक्यता
21-Mar-2023
Total Views |
मुंबई : पंजाबमधून बेपत झालेला खलिस्तानी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून नांदेड पोलिसांना सुरक्षा यंत्रणांच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमध्ये येणार्यांवर पोलिसांची कडक नजर ठेवण्यात येत आहे. अमृतपाल सिंग फरार असून पंजाब पोलीस त्याच्या मागावर आहे.
नांदेड शहरात पंजाबमधून येणार्यांची संख्या मोठी आहे. यापूर्वी पंजाबमध्ये काही खलिस्तानी अतिरेकी पकडले गेले होते. त्यामुळे अमृतपाल आणि त्याचे समर्थक नांदेडला येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात अलर्ट राहीर करण्यात आला आहे. बाहेरून जे लोक नांदेडमध्ये येतात त्यांच्यावर पोलिस लक्ष ठेऊन आहेत.पंजाब पोलीस शनिवारपासून अमृतपालचा शोध घेत आहेत. मात्र तो पोलिसांना चकवा देत आहे. हे प्रकरण आता पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात पोहोचले आहे. अमृतपाल पळून गेल्याबद्दल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले आहे.