मुंबईतील उद्यानांसाठी स्वतंत्र डीपीआरची आखणी करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
21-Mar-2023
Total Views | 91
5
मुंबई : मुंबईतील उद्यानांबाबत मंगळवारी विधानसभेत गरमागरमीची चर्चा झाली. सदस्यांनी उद्यानांमधील शौचालयासह इतर उपलब्ध सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी मुंबईतल्या सर्व उद्यानांच्या विकासासाठी स्वतंत्र डीपीआरची आखणी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली आहे.
यावेळी सरकारकडून मंत्री उदय सामंत यांनी दिलेलला उत्तरावर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी असहमती दर्शवत खोटी माहिती देणाऱ्या मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजप आमदार योगेश सागर, आशिष शेलार, भारती लव्हेकर, ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांच्यासह इतर आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुंबईतील शेकडो उद्यानांची इतक्या वर्षात झालेली दुरवस्था आणि त्यातील अनियमितता दूर करण्यासाठी सर्व उद्यानांच्या विकासासाठी स्वतंत्र डीपीआरची आखणी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली आहे.