ब्रेकींग! 'या' दोन बँकांवर RBIचे निर्बंध! तुमचे खाते तर नाही ना?

पुण्यातील दोन बँकेवर रिर्झव्ह बँकेचे निर्बंध

    14-Mar-2023
Total Views | 309
rbi-restrictions-on-two-banks-in-pune
 
पुणे : थकबाकीचे प्रमाण वाढल्याने रिझर्व्ह बँकेने डिफेन्स अकाउंट्स को-ऑपरेटिव्ह बँक आणि पुणे सहकारी बॅँक लिमिटेड या दोन्हींवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. या दोन्ही बँकांचा बँकिंग परवाना रद्द केलेला नाही. मात्र, बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधासह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल. आरबीआय बँकेच्या परिस्थितीनुसार आदेशांमध्ये बदल करू शकते, असे आरबीआयने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

या बँकांना नविन कर्जवाटप, ठेवी स्वीकारणे अथवा कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण, तसेच मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. अति तातडीच्या कारणासाठी पुणे सहकारी बँकेतील खातेदार-ठेवीदारांना जास्तीत जास्त १० हजार, तर डिफेन्स अकाउंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेतील खातेदार-ठेवीदारांना ३० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य सरव्यवस्थापक योगेश दयाल यांनी याबाबतचे आदेश १० मार्च रोजी काढले आहे. पुढील सहा महिन्यांपर्यंत या दोन्ही बँकांवर निर्बंध राहणार असून, या कालावधीत आर्थिक परिस्थिती सुधारल्यास या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो, असे आदेशात म्हटले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचार कायम!धर्मांधांनी हिंदूंच्याच दुकानांना केले लक्ष्य; अहिंदूंची दुकाने शाबूत, तर काहींनी भितीपोटी मालदात केले स्थलांतर

मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचार कायम!धर्मांधांनी हिंदूंच्याच दुकानांना केले लक्ष्य; अहिंदूंची दुकाने शाबूत, तर काहींनी भितीपोटी मालदात केले स्थलांतर

Waqf Amendment Act पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायदा संसदेत पारित केल्यानंतर धर्मांधांनी हिंदूंवर, त्यांच्या घरांवर आणि दुकानांना टार्गेट करताना दिसले आहेत. मात्र, मुस्लिमांच्या दुकानांना काहीच झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर इस्लामी कट्टरपंथीयांनी पेट्रोल आणि बॉम्बने हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले. अशातच आता मुर्शिदाबादमधून काही हिंदूंनी परिस्थिती पाहता पळ काढला आहे. अशातच संबंधित परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता बॅनर्जी सरकार अपयशी ठरल्याच्या टीका विरोधकांकडून ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121