मुंबई (प्रतिनिधी): एस एस राजामाऊली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटु-नाटु’ या गाण्याने ‘बेस्ट ओरिजीनल सॉंग’ या ऑस्कर पुरस्कावर आपले नाव कोरले आहे. यंदाच्या ‘ऑस्कर २०२३’च्या ९५व्या अकादमी अवार्ड्समध्ये ‘नाटु-नाटु’ या गाण्याने ‘सर्वोत्कृष्ट मुळ संगीत’ म्हणजेच ‘बेस्ट ओरिजीनल सॉंग’ वर भारताचे नाव कोरले असुन या गाण्यानं इतिहास रचला आहे.
मूलतः तेलगू भाषेतील RRR म्हणजेच राईज, रोअर आणि रिव्हॉल्ट या चित्रपटात भारतीय क्रांतिकारक आणि ब्रिटिश राजवटीविरुद्धचा लढा याचे काल्पनिक चित्रण केले आहे. नाटू-नाटू या गाण्याला जगभरातून पसंती मिळत असून कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील हे गाणं आहे. तर, चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं असून प्रेम रक्षित यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
संगीतकार एमएम किरवानी यांनी संगीत संयोजन केले असून पुरस्कार स्वीकारताना "हे गाणं म्हणजे प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे", असे सांगितले. आपल्या भाषणात ‘कारपेंटर्स’ या अमेरिकी संगीत जोडोप्याची गाणी ऐकत मोठा झालो असं सांगत त्यांनी गाणं ही गायलं.
RRR चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर वर ही आनंदाची बातमी शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. ऑस्करला नामांकन मिळाल्यापासुनच सारेच ऑस्करच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. या गाण्यामुळे भारताला २००८ नंतर हा दुसराच ऑस्कर मिळाला असुन भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
एनटीआर ज्युनिअर आणि रामचरण यांच्या या गाण्याचे रिल्स समाज माध्यमांवर पुन्हा व्हायरल होत आहेत. सोशल मिडीयावरुन मिम्स, रिल्स आणि पोस्ट शेअर करत चाहते आपला आनंद व्यक्त करत आहेत.