महिलाकेंद्रीत विकासाचे भारताचे ध्येय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    10-Mar-2023
Total Views | 79
Narendra Modi
 

नवी दिल्ली : गेल्या नऊ वर्षात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा दृष्टीकोन ठेऊन देश वाटचाल करत आहे. भारताने हे प्रयत्न जागतिक स्तरावर नेले असून हेच भारताच्या अध्यक्षतेखालील जी२० परिषदेत ठळकपणे दिसून येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. "महिलांचे आर्थिक सक्षमीकरण" या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते.

गेल्या नऊ वर्षांमध्ये केंद्र सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या विशेष प्राधान्य दिले आहे. महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांचे आज परिणाम दिसून येत आहेत आणि देशाच्या सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल जाणवत आहेत. गेल्या ९ ते १० वर्षांत माध्यमिक आणि त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या तिप्पट झाली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अशा विषयांसाठी मुलींची नोंदणी आज ४३ टक्के आहे, ती अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीसारख्या देशांपेक्षा जास्त आहे. वैद्यकीय, क्रीडा, व्यवसाय किंवा राजकारण यासारख्या क्षेत्रात महिलांचा फक्त सहभागच नाही वाढला तर या क्षेत्रांमध्ये त्या आघाडीवर सुध्दा आहेत.

येत्या वर्षांत दोन लाखाहून अधिक बहुउद्देशीय, दुग्ध आणि मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन केल्या जाणार आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी सहकार क्षेत्रात झालेलं परिवर्तन आणि या क्षेत्रात महिलांच्या भूमिकेवरील आपले विचार स्पष्ट केले. १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यामध्ये महिला शेतकरी आणि उत्पादक संस्था मोठी भूमिका बजावू शकतात, यावर पंतप्रधानांनी भर दिला. महिला बचत गटांमधून नवीन युनिकॉर्न तयार होण्यासाठी महिला बचत गटांना मदत करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणेबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. या महिला केवळ लहान उद्योजक म्हणूनच नव्हे, तर सक्षम व्यक्ती म्हणूनही योगदान देत आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121