मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौर्यावर येत असून छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे वंदे भारत रेल्वे गाड्यांना मोदींच्या उपस्थितीत रवाना करण्यात येणार आहे. या सोबतच पंतप्रधानांच्या हस्ते अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मरोळमध्ये मोठ्या संख्यामध्ये बोरी मुस्लिम समाज राहतो. बोरी मुस्लिम समाजाकडून मुंबईमध्ये पहिल्यांदा अल जामिया युनिव्हर्सिटी उभारण्यात आली आहे. याच युनिव्हर्सिटीचे उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी साडेचार वाजता मरोळमध्ये येणार आहेत.
कसा असेल पंतप्रधानांचा आजचा दौरा ?
- दुपारी ०२.१० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल होणार
- मुंबई विमानतळावरून हेलिकॉप्टरने आयएनएस शिक्रावरती येणार
- दुपारी ०२.४५ वाजता सीएसएमटी स्थानकावर पोहोचतील.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्लॅटफॉर्म अठरा वर दोन मिनिटांसाठी चालत वंदे भारतच्या ट्रेनकडे जाणार आहेत.
- वंदे भारतमध्ये लहान मुलांसोबत ७ मिनिट पंतप्रधान संवाद साधतील
- वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील, साधारणता ३ मिनिटांचा हा कार्यक्रम असेल
- वंदे भारतच्या संदर्भात पंतप्रधानांना १ मिनिटाचे सादरीकरण रेल्वे अधिकाऱ्यांकडून केले जाणार
- दुपारी ०३:५५ वाजता पंतप्रधान सीएसएमटीवरून आयएनएसवर दाखल होऊन हेलिकॉप्टरने मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना होतील.
- दुपारी ०४:.२० मिनिटांनी मुंबई विमानतळ दाखल होतील.
- मुंबई विमानतळ ते मरोळ मोदी रस्ते मार्गाने प्रवास करणार
- मरोळ येथील कार्यक्रमाला ४.३० वाजता पोहचतील.
- ऑलझकेरिया ट्रस्ट सैफी नवीन कॅम्पसच उद्घाटन होईल.
- ५.५० वाजता मरोळहून कारने मुंबई विमानतळावर जाणार आहेत.
- सहा वाजता मुंबई विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत.