भारताच्या इस्लामीकरणासाठी PFI गट अद्यापही कार्यरत!
बंदीनंतरही PFI कार्यरत!
09-Feb-2023
Total Views | 146
8
मुंबई : बंदी घातल्यानंतरही PFI संघटना सक्रीय असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाच जणांविरोधात महाराष्ट्र एटीएसने १११३ पानी पत्र दाखल करून याबद्दल खुलासा केला आहे. अत्याचाराची चुकीची माहिती देऊन मुस्लीम तरुणांची माथी भडकवण्याचे काम सुरू असल्याचा दावाही केला होता. PFI तर्फे रा.स्व.संघ आणि भाजप नेत्यांवर पाळत ठेवण्याचे कामही केले जात होते. या संदर्भातील निनावी पत्र आणि अन्य पुरावेही महाराष्ट्र एटीएसने सादर केले आहेत.
09 February, 2023 | 13:38
अॅसिड, चाकू आणि सोडा वॉटर बॉटल्सही घरात बाळगा, अशा सूचना पीएफआय कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. एटीएसने या संदर्भातील एक सीडीही पुरावा म्हणून सादर केली आहे. यात पीएफआयच्या कारनाम्यांचा लेखाजोखा सादर करण्यात आला आहे. PFI तर्फे वेगाने प्रगती करत असलेल्या भारत देशाला आघात पोहोचवण्याचाए कट रचला जात होता. याचे नियोजन केले जात असल्याचीही माहिती आहे.
09 February, 2023 | 13:39
कार्यकर्त्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याऐवजी देशात राहूनच मोठी कारवाई करण्याच्या तयारीत ही संघटना होती. पीएफआयने २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र म्हणून स्थापित करण्याचा मनसूबा रचला होता. चार पायऱ्यांमध्ये हा कार्यक्रम आखला जाणार होता. रा.स्व.संघ संघटनांसारख्या हिंदू संघटनांना लक्ष्य करण्याचाही मनसूबा PFI ने रचल्याचे महाराष्ट्र एटीएसने आपल्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे.
09 February, 2023 | 13:39
काश्मीर आणि लक्षद्वीपसाठी विशेष मोहिम
PFI तर्फे ज्या जम्मू काश्मीर आणि लक्षद्वीपमध्ये असलेल्या आठ मुस्लीम बहुल जिल्ह्यांना टार्गेट केले जाणार होते. इथल्या मुस्लीम वस्तीचा फायदा घेत अन्य धर्मीयांविरोधात तरुणांची माथी भडकवण्याचे काम केले जाणार असल्याचेही महाराष्ट्र एटीएसने आपल्या तपासत उघड केल आहे.
09 February, 2023 | 13:40
रा.स्व.संघाच्या प्रमुख नेत्यांवर PFI सदस्यांची नजर
पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था ध्वस्त करण्याचा मनसूबाही PFI रचत आहे. या आरोपपत्रातील खुलाश्यानुसार, देशात अशांततता पसरवण्यासाठी पीएफआय तर्फे कॅडरचा वापर केला जाणार होता. एससी, एसटी आणि भटक्या वनवासींनाही हाताशी घेण्याचा कट रचला जात होता.