मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग हटवणार का? : ओवैसी
08-Feb-2023
Total Views | 74
12
मुंबई : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना आक्रमक भुमिकेत दिसले. यावेळी त्यांनी चीनच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरले. ते म्हणाले, "भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये भगवा, पांढरा, हिरवा आणि निळा असे रंग आहेत. आपण या झेंड्याला तिरंगा असंही म्हणतो. या तिरंग्यातून मोदी सरकार हिरवा रंग हटवणार आहेत का? असा सवाल त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले, "सरकारने जर तिरंग्यातून हिरवा रंग काढून टाकला तर ते कलिंगडावरही बंदी घालणार का? फक्त नागपूरचं संत्रंच खाल्लं जावं असा आदेश काढणार का? आपल्या देशातल्या लोकसंख्येचा भाग ज्या अल्पसंख्याकांनी व्यापला आहे, त्या अल्पसंख्याक वर्गाबाबत आम्ही राष्ट्रपतींच्या भाषणात एक ओळही ऐकली नाही. मुस्लिमांना कायमच हिरव्या रंगाशी जोडलं जातं तुम्ही कशा कशावर बंदी घालणार? असेही प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केले.
महत्त्वाच्या बातम्या :
08 February, 2023 | 15:43
08 February, 2023 | 15:43
08 February, 2023 | 15:43
08 February, 2023 | 15:45
"चीनच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार का? बिल्किस बानोला न्याय मिळणार का? जो अर्थसंकल्प केंद्र सरकारने नुकताच सादर केला त्यातही अल्पसंख्याक वर्गाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं आहे. अल्पसंख्याक खात्यासाठी करण्यात आलेली तरतूद ही गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ टक्के कमी आहे. असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.