वर्धा : साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनी ४ फेब्रुवारी रोजी वर्ध्यात होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. अभय बंग सुद्धा उपस्थित होते. विद्रोही संमेलन हे अकील भारतीय साहित्य संमेलनाचा निषेध करण्यासाठी होते हे सर्वश्रुत आहेच. अशावेळी संमेलनाध्यक्षयांनी विद्रोही संमेलनाच्या मंडपात जाऊन काही वेळ थांबून येणे सर्वांसाठीच आश्चर्यकारक बातमी होती.
तरुणभारतला दिलेल्यामुलाखतीत नरेंद्र म्हणाले होते, "वेगवेगळी साहित्य संमेलने भरणे यात चुकीचे काही नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे व्यासपीठ आपल्याला अपुरे पडते आहे आणि आपण वेगळे संमेलन करावे असे वाटणे अयोग्य नाही. अशा वेगवेगळ्या गटांच्या किंवा प्रादेशिक विभागांच्या, संमेलनात जर मराठी साहित्याच्या आजच्या स्वरूपाबद्दल गंभीर चर्चा झाली तर त्यामुळे साहित्य चर्चेला मदतच होईल. यानिमित्ताने अनेक लेखकांनाही आपले म्हणणे मांडता येईल. यादृष्टीने अगदी जिल्हा पातळीवरचे संमेलनेसुद्धा उपयुक्त होऊ शकतील. त्याचे कार्यक्रम ठरवताना मात्र ते वाचकांना आणि श्रोत्यांना त्यांची वाङ्मयाभिरुची वाढवणारे असावेत याचा विचार केला पाहिजे."
यावेळी त्यांना प्रश्न विचारताना विद्रोही संमेलनासोबतच इतर होणाऱ्या संमेलनांबाबतही विचारण्यात आले होते. त्यांनी यावेळी उत्तर दिल्यानंतर आपले शब्दही खरे करून दाखवले. सर्व संमेलने कातर व्हायला हवीत. त्यांचेही प्रश्न आपण ऐकून घ्यायला हवेत असे मत यावेळी चपळगावकरांनी व्यक्त केले.