‘एमआयएम’नंतर ‘बीआरएस’ची घुसखोरी

    05-Feb-2023
Total Views | 155
 
Bharat Rashtra Samiti
 
जनाधार नसणे तसेच ठोस भूमिकेचा अभाव असलेले आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उठाठेव करत असतात. त्यातूनच काँग्रेस आणि डाव्या पक्षातून शकले झालेले पक्ष मुठभर लोकांना लाभाचे आमिष दाखवून महाराष्ट्रात घुसखोरी करू लागले. कांशीराम-मायावती यांचा बसपा, लालूंचा राजद, केजरीवाल यांचा आप, ओवेसींचा ‘एमआयएम’ आणि आता ‘तेलंगण राष्ट्र समिती’ नावाने परिचित नाव बदललेला ‘भारत राष्ट्र समिती’ हे पक्ष महाराष्ट्रात स्पेस शोधण्यासाठी उतावीळ झाले आहेत.
 
महाराष्ट्राच्या राजकारणात इतर राज्यातील राजकीय पक्षांनी येऊन बस्तान मांडणे आणि आपली दुकानदारी चालविणे हे नवे नाही, डाव्या पक्षांनी हे प्रयोग करून बघितल्यावर आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि विचार स्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी मग काँग्रेस आणि डाव्या पक्षातून शकले झालेले अनेक पक्ष मुठभर लोकांना लाभाचे आमिष दाखवून महाराष्ट्रात घुसखोरी करू लागले, कांशीराम-मायावती यांचा बसपा, लालूंचा राजद, केजरीवाल यांचा आप, ओवेसींचा ‘एमआयएम’ आणि आता तेलंगण राष्ट्र समिती नावाने परिचित नाव बदललेला भारत राष्ट्र समिती हा पक्ष या राज्यात स्पेस शोधण्यासाठी उतावीळ झाला आहे.
 
या मागे त्यांचा केवळ राजकीय स्वार्थ तर आहेच, मात्र राज्यात विषमतेची बीजे पेरण्याची कामे या पक्षांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या केली आणि स्वातंत्र्यापासून सर्वाधिक सत्ता उपभोगलेल्या मात्र देशासाठी, प्रांतासाठी कोणतीही लक्षणीय कामगिरी न करता केवळ भ्रष्टाचार आणि जातीयता पसरविण्याचे काम केलेल्या काँग्रेस पक्षाला मदत केली हा इतिहास सर्वश्रुत आहे. यामुळे अशा राजकीय माध्यमातून विचारांची, विखारी आणि विभाजित पेरणी या पक्षाला येथे करू देण्याला सर्वस्वी काँग्रेस पक्षच जबाबदार आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात तर ही जातीयवादी विचार पेरणी येथील प्रस्थापित पक्ष करीतच आहेत. मात्र, आता हिंदुत्वाच्या नावाखाली आपल्या पित्याच्या कर्तृत्वावर नावारुपास आलेला पक्ष देखील अशा विखारी लोकांचे समर्थन करू लागला ही शोकांतिका ठरू पाहत आहे. ‘एमआयएम’ने हेच केले, मराठवाड्यात या पक्षाने शेजारच्या आंध्र प्रदेशातून प्रवेश केला आणि थेट विधानसभेत येऊन आपला जहाल चेहरा दाखविला, त्यामुळे येथील जातीयवादी पक्षांनी केवळ भाजपला प्रखर विरोध करून या पक्षांना मदत केली हे उघड आहे, टिपू सुलतानचे उदात्तीकरण हा त्यापैकी एका षड्यंत्राचा भाग. पण, सुदैवाने राज्यात फडणवीस-शिंदे सरकार आले आणि हा डाव उधळला गेला. यात खरे तर त्या पक्षांचे नुकसान होण्यापेक्षा राज्यातील लोकांचे अधिक नुकसान होत आहे, येथील लोकांची आमिष दाखवून दिशाभूल करीत हे पक्ष केवळ स्वतःचा हेतू तर साध्य करीतच आहेत. मात्र, सीमावाद, प्रांतवाद पेटवित आहेत.
 
‘एमआयएम’चा 2009 मध्ये प्रवेश झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांतून आता विधानसभेत या पक्षाचे असणे राज्याच्या अस्मितेसाठी धोका ठरता कामा नये ही बाब सुजाण नागरिकांनी किमान लक्षात घ्यायला हवी. आधीच्या काँग्रेस सरकारच्या धोरणामुळे आणि आपल्याच भागातील सीमावर्ती लोकांना दुर्लक्षित ठेवल्यामुळे या विभाजन प्रवृत्ती असणार्‍या लोकांचे फावले आणि त्या भागातील लोकांची सहानुभूती मिळवून आता आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हे महाराष्ट्रात घुसखोरी करू लागलेत. सर्व मुस्लीम लोकांचे ऐक्य साधण्याच्या नावाखाली ‘एमआयएम’चा प्रवेश हा समाजात दुही पसरविण्याचा भाग होता हे अनेकदा स्पष्ट झाले, रझाकारची कृत्ये याची साक्ष आहेत, एकीकडे लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या नावावर आमिष दाखवायचे आणि दुसरीकडे राज्यात दूही माजवून देश विघातक शक्तींना पाठिंबा द्यायचा हा डाव खेळला गेला, सुदैवाने भाजपने तो चव्हाट्यावर आणला, अन्यथा येथील सत्तेसाठी हपापलेले राजकीय पक्ष राज्यातील अशा विघातक कृत्यांना देखील पाठीशी घालण्यात धन्यता मानतात हे सर्वश्रुत आहे, ‘एमआयएम’ने हीच संधी साधली आणि आपले प्रस्थ वाढविण्यास सुरुवात केली.
 
आता मराठवाडयातील परिसरातूनच के. चंद्रशेखर राव नावाच्या तेलंगणा राज्यातील अपयशी नेत्याचे महाराष्ट्रात येणे आणि या मागील हेतू लक्षात घेतानाच लोकांनी सावध होणे गरजेचे आहे. आपल्या राज्यातील पाण्यावर डोळा असलेला हा नेता त्याच्या कुटील राजकीय खेळीतून आपला डाव साधता कामा नये हे आधी सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. या राज्याने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सीमेवरील मांजरा नदीच्या पात्रात ’सालुरा जॅकवेल’ च्या माध्यमातून चोरले आहे, त्या आधी चंद्राबाबू नायडू यांनीदेखील या राज्यातील पाण्यावर हक्क सांगून आंदोलन केल्याचा इतिहास जुना नाही, त्यामुळे खरे तर मराठवाड्यातील जनतेने सावध भूमिका घेत अशा लोकांना पाठबळ देता कामा नये, ‘एमआयएम’ची फुटीर कृत्ये भोगत असताना आता हे राव नावाचे गृहस्थ पाय रोवत असतील, तर आधी त्यांची महाराष्ट्रविरोधी भूमिका डोळ्याआड करून चालणार नाही, अन्यथा उद्या विचार स्वातंत्र्याच्या नावावर तालिबानी प्रवृत्तीदेखील येथे पाय रोवायला मागे पुढे पाहणार नाही. या देशातीलच राजकीय लोकांनी असे चुकीचे पायंडे पाडून आपल्या शत्रूंना संधी देता कामा नये, मग बांगलादेशी घुसखोर, रोहिंगे जसे लपून छपून येथे आश्रय घेतात तसे हे शेजारी राज्यातील लोकच उद्या डोईजड ठरले, तर प्रश्न अधिक बिकट होत जातील, त्यामुळे राजकीय स्पेस मिळविण्यासाठी राज्यात घुसखोरी करू पाहणारे हे ओवेसी, चंद्रशेखर राव यांच्यासारखे स्वार्थी लोक वेळीच रोखले पाहिजेत. राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने देखील ही बाब येथील स्थानिक मतदारांना चिंतन करायला लावणारी आहे. कारण, आपल्या भागातील हक्काचे पाणी आपल्याला मिळवण्याचा अधिकार असताना अशा राजकीय आमिशाच्या माध्यमातून ते नेण्याची ही चाल लोकांनी ओळखली, तर पुढील निर्माण होणारे सीमावादासारखे अनेक प्रश्न निर्माण होणार नाहीत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121