मोठी बातमी! असलम शेख यांची चौकशी होणार? ईडीने मागितला अहवाल!
बेकायदा स्टुडीओ प्रकरणात ईडीने मागविला अहवाल
03-Feb-2023
Total Views | 84
17
असलम शेख यांची चौकशी होणार? ईडीने मागितला अहवाल!
मुंबई : बेकायदा स्टुडिओ प्रकरणाचा आरोप असलेले काँग्रेसचे माजी मंत्री असलम शेख यांच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ट लागणार आहे. स्टुडीओ घोटाळा प्रकरणात मुंबई महापालिकेकडून ईडीने अहवाल मागितला आहे. असलम शेख यांचा मार्वेमध्ये हजार कोटींचा स्टुडीओ आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. अनिल परबांच्या कार्यालयावर हातोडा पडल्यानंतर पुढचा नंबर असलम शेख यांचा असेल, असा इशाराही सोमय्यांनी दिला होता.
03 February, 2023 | 14:29
असलम शेख यांच्या स्टुडीओ घोटाळ्या प्रकरणात मुंबई महापालिका आयुक्तांनी मढ, एरंगलसह भाटी गावातील एकूण ४९ स्टुडीओंची चौकशी केली होती. याच चौकशी समितीच्या अहवालाची मागणी आता ईडीने केली आहे. असलम शेख यांच्यावरील ही चौकशी मनी लाँडरींग आणि फेमा कायद्याअंतर्गत होणार असल्याचेही वृत्त आहे.
03 February, 2023 | 14:30
नेमकं प्रकरण काय?
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या आपल्या बेधडक पोलखोल करण्यासाठी चर्चेत असतात. किरीट सोमय्यांनी म्हाडाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे माजी मंत्री आमदार अनिल परबांच्या बेकायदा कार्यालयावर हातोडा फिरवण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा नंबर असलम शेख यांचा असेल, अशी माहितीही दिली होती.
03 February, 2023 | 14:30
मालाडमध्ये मढ, एरंगलमध्ये व्यावसायिक स्टुडिओचे बांधकाम बेकायदेशीर व सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून झाल्याचा आरोप आहे. तसेच मढच्या समुद्रात नियमांना धाब्यावर बसवत स्टुडिओचे बांधकाम केल्याचा आरोप आहे. 5 स्टुडिओ सीआरझेड झोनमध्ये येत असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. महाविकास आघाडी सरकार असताना पर्यावरण मंत्रालयाच्या मदतीने अस्लम शेख यांनी स्टुडिओच्या बांधकामास मदत केल्याचाही सोमय्यांचा आरोप आहे. या तक्रारीनंतर पर्यावरण विभागाकडून अस्लम शेख यांनी नोटीस बजावण्यात आली होती.