मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्यास ताब्यात घेतले असून NIA ने दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा पूर्वीच दिला होता. पोलिसांकडून संशयित दहशतवादी सरफराज मेमनला अटक करण्यात आली आहे. मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती NIA कडून मुंबई पोलिसांसह इतर यंत्रणांना देण्यात आली होती. NIA च्या माहितीच्या आधारावर इंदूर पोलिसांकडून सरफराज मेमनला ताब्यात घेण्यात आले असून सरफराजच्या चौकशी करण्यासाठी इंदूरमध्ये महाराष्ट्र एटीएस दाखल झाले आहे.
चीन आणि पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेऊन सरफराज मेमन भारतात आला असल्याची माहिती NIA कडून देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे NIA ने पोलिसांना सतर्क राहण्याचे देखील आवाहनकेले होते. NIA कडून देण्यात आलेय माहितीच्या आधारावरच मुंबई पोलीस आणि एटीएस तसेच इतर यंत्रणाकडून तपास सुरु करण्यात आला होता. या तपासात यश पोलिसांना यश आले असून पोलिसांनी संशयित सरफराज मेमनला अटक केली आहे.
NIA ने दिलेला धोक्याचा इशारा
NIA ने मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा ई-मेल केला होता. त्यांनतर तपास यंत्रणाकडून यासंदर्भात तपास करण्यास सुरवात करण्यात आली. मुंबईमध्ये सध्या एका धोकादायक व्यक्तीचा वावर असून सरफराज मेमन असे या व्यक्तीचे नाव असल्याचा उल्लेख या ईमेलमध्ये करण्यात आला होता. तसेच ही व्यक्ती परदेशात प्रशिक्षण घेऊन आलेली असून धोकादायक असल्याने सतर्क राहावे अशा सूचना एनआयएकडून देण्यात आल्या होत्या. एवढंच नाही तर मुंबईत फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती ही इंदूरची राहणारी असून या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतल्याचेही या मेलमध्ये लिहिण्यात आले होते. यासोबतच ई-मेलमध्ये या संशयित व्यक्तीची आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि एलसी कॉपीही जोडण्यात आल्या होत्या.