रशियाने सुरु केलेल्या युद्धाचा शेवट युक्रेन करणार?
25-Feb-2023
Total Views | 26
1
मुंबई : युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. जगभराने रशियाचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्र सभेत जर्मनीने प्रस्ताव ठेवला. यामध्ये रशियाने युक्रेनमधून सैन्य मागे घेण्याची मागणी केली आहे. १४१ देशांनी प्रस्तावाच्या समर्थनार्थ मत टाकले. रशियासह सात देशांनी विरोध केला. रशियाने युद्धाची सुरुवात करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना त्यांच्या सैनिकांनी आश्वासन दिले होते की, 'युक्रेन काय आपण दोन आठवड्यांत संपवुन टाकु.' मात्र या दोन आठवड्यांचे आता ५२आठवडे झाले तरी रशियाला ते काही जमले नाही.
युद्धदरम्यान, कधी रशियाची सरशी होते तर कधी युक्रेनची. रशिया हा महासत्त्ताक देश आहे. पण, युक्रेन लहान देश आहे. युक्रेनची लोकसंख्या कमी आहे. युक्रेनजवळ सैन्यबळ ही कमी आहे. तरीही, रशियाला ही लढाई जिंकता येत नाहीय. त्यामुळे आता कुठेतरी असं वाटु लागलयं की युक्रेनचं ही लढाई जिंकतो की काय? प्रत्यक्ष युक्रेनची २० टक्के भुमी ही रशियाच्या ताब्यात आहे. सुरुवातीला अचानक झालेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनची ३० टक्के भुमी रशियाला मिळाली. पण, नंतर युक्रेनने प्रतिहल्ले सुरु केले आणि रशियन सैनिकांना मागे रेटत आणलं.
आता, ही लढाई मुळात युक्रेनवर आपलं अधिराज्य असावं हे पुतिन यांच ९०च्या सालापासुनचं स्वप्न होतं. कारण ९० सालापासुनच युक्रेन वेगळा झाला होता. पुतिन यांच्या त्याच स्वप्नाची पुर्तता करण्यासाठी ही लढाई सुरु झाली. युक्रेनला पाश्चात्य देशांनी भरपुर मदत केली, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्यात आली. यामध्ये तुलनात्मक रशिया शक्तिशाली वाटतं होता. पण, रशियासाठी हे वाटते तितके सोपे नव्हते. रशियाने ३००० रणगाडे या युद्धात पाठवले. परंतु त्या ३०००पैकी १४२५ रणगाडे युक्रेनियन सैनिकांनी उध्द्वस्त केले.
महत्त्वाचं म्हणजे, रशिया ज्या सैनिकांना युध्दात उतरवत आहे, त्यातले बरेचसे सैनिक हे सायबेरीया मधुन आणले आहे. त्यामुळे ते कित्येकवेळा रणगाडे सोडुन पळुन गेले. रणगाड्यांचा नाश झाला. त्यामुळे रशियाची कुठेतरी पिछेहाट होताना दिसते आहे. त्यामुळे आज कुठेतरी अशी परिस्थिती आहे की, रशियाकडे सैन्य नाहीय. रशिया सध्या युरोपप्रमाणे Negetive Population Growth मध्ये आहे. त्याची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत जात आहे.
आजच्या वृत्तानुसार, रशियाचे २लाख सैनिक युद्धात मरण पावले. युक्रेनचे ही १ लाख सैनिक, ३० हजार नागरिक मरण पावलेत. रशियाला ज्यावेळेस लक्षात आलं की, आपल्याला हे युध्द जिंकता येत नाहीय, तेव्हा रशियाने चिडुन मिसाईल्स चा वापर करुन हल्ला चढवला. हल्ला केलेल्या त्या युक्रेनच्या शहरांची वीजकेंद्र उध्द्वस्त करण्याचा सपाटा सुरु आहे. कारण, युक्रेन अंधारात बुडावा, थंडीमुळे घराच सेंट्रल हिटींग बंद पडेल. असा रशियाचा प्रयत्न आहे.
त्यामुळे कोणीही माघार घेताना दिसत नाहीयं. जगाच्या डोक्यावर जागतिक महायुध्दाची टांगती तलवार राहणारचं आहे, कारण रशियाने सांगितलेच आहे की, गरज पडल्यास आम्ही आण्विक हत्यारे सुद्धा वापरु. जर, रशियाने आण्विक हत्यारे वापरली तर हे युध्द जागतिक महायुध्द होण्याचा धोका पुर्णपणे साकारलेला असेल.
- १८ टक्के युक्रेन क्षेत्रावर रशियाचा ताबा
- २ लाख रशियन सैनिक जखमी आणि मृत्यूमुखी
- ३० हजारांपेक्षा युक्रेन नागरिक मृत्यूमुखी
- १.४ कोटी लोकांचे युक्रेनमधून स्थलांतरण
- २५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रकमेची अमेरिकेकडून मदत
- ३२ लाख कोटींचे संपूर्ण जगाला नुकसान
- २० कोटींपेक्षा अधिक लोक युद्धानंतर उपासमारीने बेजार