नॉमिनेशन : अर्थ आणि व्याप्ती

    25-Feb-2023
Total Views | 126
Nomination
 

हल्लीच्या सोसायटीच्या जमान्यात सोसायटी शेअर सर्टिफिकेट हस्तांतरणाकरिता नॉमिनेशन केले की आपल्या पश्चात मालमत्तेची व्यवस्था लावण्याचे काम पूर्ण झाले, आता काहीही करायची आवश्यकता नाही असा बहुतांश लोकांचा आजही गैरसमज आहे.

 नॉमिनेशन ही एक कायदेमान्य व्यवस्था आहे यात काहीही वाद नाही, मात्र नॉमिनेशन केले की निर्धास्त व्हावे अशी परिस्थिती निश्चितच नाही. कारण नॉमिनेशन ही एक रूढ आणि सोप्पी पद्धत असली तरीसुद्धा तिला काही कायदेशीर मर्यादा आहेत. नॉमिनी म्हणजे नक्की काय? त्याचा कायदेशीर दर्जा काय? हे विविध खटल्यांच्या निकालात वारंवार स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यानुसार नॉमिनीचा दर्जा हा मालकाचा नसून विश्वस्ताचा आहे. जिथे एकापेक्षा अनेक वारस असतील आणि त्यापैकी एखाद्याच वारसाला नॉमिनी नेमले असेल, तर तो नॉमिनी पूर्ण मालक न होता इतर वारसांच्या हक्काकरिता विश्वस्त होतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अनेकांपैकी एकाला नॉमिनी केले म्हणजे बाकी वारसांचा हक्क संपुष्टात येत नाही, इतर वारस यथायोग्य न्यायालयात दाद मागून आपला हक्क व हिस्सा निश्चितपणे मिळवू शकतात. असे झाले तर एकाच वारसाला नॉमिनी नेमले म्हणजे त्यालाच सगळे मिळेल हा उद्देश पूर्णत: विफल होतो.

नवऱ्याने घेतलेल्या मालमत्तेत बायकोला नॉमिनी करणे बंधनकारक आहे हा नॉमिनेशनबद्दल अजून एक अत्यंत चुकीचा गैरसमज आहे. सद्यस्थितीत प्रचलित कोणत्याही कायद्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने एखाद्या विशिष्ट व्यक्तीस किंवा नातेवाईकास नॉमिनी नेमण्याची सक्ती नाही. स्वष्टार्जित मालमत्तेबाबत मालकाला पूर्ण तर वडिलोपार्जित मालमत्तेबाबत आपापल्या हक्क आणि हिश्श्यापुरते अधिकार असतात. साहजिकच अशा कोणत्याही अधिकारांचे नॉमिनेशन विशिष्ट व्यक्तीस करण्याची सक्ती म्हणजे त्या अधिकारांवर अतिक्रमण ठरणार असल्याने अशी तरतूद सध्या अस्तित्वात नाही आणि भविष्यातदेखील अस्तित्वात येण्याची शक्यता जवळपास नाहीच असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
नॉमिनेशन केल्याने अंतिम हेतू साध्य होण्याची खात्री नसेल तर मग यावर उपाय काय? तर आपल्या मालमत्तेची आपल्या मनानुसार आपल्या पश्चात व्यवस्था लावण्याकरता वेळीच मृत्युपत्र करून ठेवणे हा एक चांगला उपाय ठरू शकतो. नॉमिनेशनप्रमाणे मृत्युपत्राची व्याप्ती मर्यादित नसल्याने, मृत्युपत्रानुसार आपण ज्याला जे देऊ त्याला ते मालक म्हणून मिळेल आणि उपभोगता येईल. मृत्युपत्र करतानासुद्धा स्वकष्टार्जित मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्तेतील भेद लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत काहीही करण्याचा संपूर्ण अधिकार मालकाला असतो, मात्र वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचा असा अधिकार मर्यादित असतो हे ध्यानात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

मृत्युपत्र म्हटले की आजही अनेकांच्या भुवया उंचावतात आणि ‘एवढय़ात काय घाई आहे? निवांत म्हातारपणी करू’असा विचार बहुतांश लोक करतात. निधन जेवढे निश्चित आहे, तेवढीच त्याची वेळ अनिश्चित आहे हे लक्षात घेऊन आपण शक्य तेवढय़ा लवकर आपापले कायदेशीर मृत्युपत्र करणे गरजेचे आहे. मृत्युपत्र केले आणि नंतर परिस्थिती बदलली तर काय? हा अजून एक प्रश्न अनेकांच्या मनात असेल. प्रत्येक नवीन मृत्युपत्र आधीची सगळी मृत्युपत्रे आपोआप रद्द करत असल्याने, बदलत्या परिस्थितीत आपण नवीन मृत्युपत्र करू शकतो, त्यामुळे त्याबाबतीतसुद्धा धास्ती बाळगायची काहीच आवश्यकता नाही. अर्थात मृत्युपत्र करणे ही सक्तीची नसून ऐच्छिक बाब असल्याने आपल्या मनानुसार आपल्या मालमत्तेची व्यवस्था लावून, आपल्याच वारसांमध्ये होणारे संभाव्य तंटे आणि खटले टाळायचे की नाही हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे.
 
-अ‍ॅड. तन्मय केतकर
 
 tanmayketkar@gmail.Com




अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty..

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121