नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली येथे २६ फेब्रुवारी रोजी साप्ताहिक विवेकनिर्मित कालजयी सावरकर हा चरित्रपट दाखविण्यात येणार आहे.
देशाची राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माय होम इंडियाचे संस्थापक आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी साप्ताहिक विवेकनिर्मित कालजयी सावरकर या चरित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे. यावेळी सुनील देवधर हे कालजयी सावरकर या विषयावर उपस्थितांना संबोधित करणार आहेत. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या व्यक्तिमत्त्वांचे आयुष्य फक्त चरित्र म्हणून ओळखले जाऊ नयेत, तर खर्या् अर्थाने त्यांच्या ‘कालजयी’ विचारांचा पुरस्कार व्हावा आणि त्यांचे चरित्रपट हे विचारपट म्हणून स्वीकारावेत म्हणून ‘कालजयी सावरकर’ हा लघुपट निर्माण करण्यात आला आहे. ‘विवेक समूह’ गेली अनेक वर्षे विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. त्यात अतिशय तेजस्वी आणि अभिमानस्पद पाऊल म्हणजे, ‘दुर्दम्य लोकमान्य’ हे प्रथम पुष्प आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील ‘कालजयी सावरकर’ हे द्वितीय पुष्प.