मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गुहागरच्या समुद्र किनारी महाराष्ट्र कांदळवन कक्ष , महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या समन्वयाने दोन ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाईट टॅग लावण्यात आले आहेत. टॅगिंग केलेल्या दोन कासवांची नावे 'बागेश्री' आणि 'गुहा' अशी आहेत.
सध्या कोकणात सागरी कासवांच्या विणीचा हंगाम सुरू आहे. याच हंगामात किनाऱ्यावर येणाऱ्या कासवांना सॅटेलाईट टॅग लावण्याचे काम गेल्यावर्षी कांदळवन कक्षाने भारतीय वन्यजीव संस्थानच्या सहकार्याने केले होते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पहिल्यांदाच हा सॅटेलाईट टॅगिंगचा प्रकल्प राबवला असून त्यात ५ कासवांना हे टॅग्स लावण्यात आले होते. परंतु सहा महिन्यांच्या कालावधीतच हे टॅग्स अकार्यान्वित झाल्यामुळे यंदा पुन्हा गुहागरच्या किनारी दोन कासवांना टॅग लावण्यात आले आहेत. हे टॅग्स लावून दि. २२ फेब्रुवारी रोजी बुधवारी सकाळी ही कासवे पुन्हा समुद्रात सोडण्यात आली आहेत. या टॅग्समुळे कासवांच्या भौगोलिक तसेच इतर अंगांनी अभ्यास करण्यासाठी मदत होणार आहे.
23 February, 2023 | 11:55
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.