ठाकरे गट आमदार प्रकाश फातर्फेकरांच्या मुलाची सोनू निगमला मारहाण !

    21-Feb-2023
Total Views | 126
मुंबई : सोमवारी रात्री एका संगीत मैफिलीचा समाप्तीनंतर सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यासोबत काही पुरुषांकडून गैरवर्तन करण्यात आले. आपल्यासोबत जबरदस्तीने सेल्फी काढावा म्हणून एक घोळका सोनू यांच्या निकट गेला असता धक्का बुक्की झाली आणि सोनूचे सहकारी पायऱ्यांवर खाली पडले. जमलेल्या गदारोळात एक मुलगा मुंबईतील ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांचं असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सोनूला कोणतीही शारीरिक हानी पोहोचली नसल्याचे त्याने मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिलेल्या व्हिडिओमधून स्पष्ट होते.

sonu 
 
ज्यावेळी सोनूला धक्काबुक्की करण्यात आली तेव्हा त्याच्या टीमचे सदस्य रब्बानी चेंबूरमधील एका संगीत महोत्सवात मंचावरून खाली उतरत असताना त्यांना पायऱ्यांवरून फेकण्यात आले. या घटनेनंतर सोनूने चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सांगितले. तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “संगीत संपल्यानंतर मी स्टेजवरून खाली येत असताना एका व्यक्तीने मला धरले. त्यानंतर मला वाचवण्यासाठी आलेल्या हरी आणि रब्बानी यांना त्यांनी धक्काबुक्की केली. मग मी पायरीवर पडलो. काही लोखंडी सळ्या पडल्या असत्या तर आज रब्बानीचा मृत्यू झाला असता. अशा प्रकारे त्याला ढकलण्यात आले होते.
 
सोनूने आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की, सामान्य लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आपण ही तक्रार नोंदवली आहे. तो म्हणाला, "मी तक्रार दाखल केली आहे जेणेकरून लोकांनी जबरदस्तीने सेल्फी किंवा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर काय परिणाम होईल याचा विचार करावा." सोनूच्या तक्रारीनंतर, आयपीसी कलम 323 (स्वच्छेने दुखापत करण्यासाठी शिक्षा), 341 आणि 337 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यामुळे दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121