'त्यानं' चेंडूला व्हॅसलिन लावून भारताचा धुव्वा उडवला होता! : बॉल टेम्परींगचं पहिलं प्रकरण
20-Feb-2023
Total Views | 225
56
मुंबई : क्रिकेट विश्वात बॉल टेम्परिंग प्रकरणी वाद काही नवा नाही. १९७७ मध्ये इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध चेन्नईतील तिसर्या कसोटीत गोलदांज जॉन लिव्हरने चेंडूला व्हॅसोलिन लावून स्विंग गोलदांजी करुन भारताची दाणादाण उडविली होती. त्याचा सहकारी बॉब विलिसने चेंडू अधिक स्वींग व्हावा यासाठी हा प्रयत्न केल्याचा आरोप होता. पण या प्रकरणी कोणावरही कारवाई झाली नाही.
१९९० मध्ये न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्ध फैसलाबाद कसोटीत बाटलीचे बूच वावरत चेंडूची शिवण उसवण्याचा प्रयत्न केला. त्या कसोटीत स्प्रिंस प्रिंगलने सामन्यात ११ गडी बाद केले होते. या प्रकरणीही कोणतीच कारवाई झाली नाही. १९९४ मध्ये दक्षिण आफ्रिके विरुध्द लॉर्डस कसोटीत इंग्लंडचा कर्णधार माईक ऑर्यरटनने चक्क पँटच्या खिशातून आणलेली माती चेंडूवर घासण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने हात कोरडे करण्यासाठी आपण माती आणतो. असा युक्तिवाद केला. या प्रकरणी त्याच्यावर मानधन कपातीचा दंड झाला. पण निलंबन टळले. नेतृत्वही सहीसलामत बचावले.
२००० मध्ये श्रीलंकेत तिरंगी एकदिवसीय मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढतीत पाकिस्तानी जलद गोलदांज वकार युनूसने बोटाने चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर त्याला ५० टक्के मानधन कपातीचा दंड करण्यात आला. २००१ साली दक्षिण आफ्रिके विरुद्ध दुसर्या कसोटील सचिन तेंडुलकरने चेंडू वरील माती ओरबडून काढण्याचा प्रयत्न किला. पण सामनाधिकारी माईक डेनिस यांनी याला बॉल टेम्परिंग संबोधन सचिनवर एक सामन्याची बंद लादली.
अर्थात भारतीय संघ व्यवस्थापनाने दौरा अर्ध्यावर सोडण्याची बेधडक धमकीही दिली. सचिन निर्दोष होता. त्याने फक्त चेंडूंवरील माती काढण्यासाठी पंचाची परवानगी घेतली नव्हती. २००४ साली ब्रिस्बेन मधील तिरंगी बनडे मालिके दरम्यान झिम्बावे विरुद्ध लढतीत राहूल द्रविडने चेंडूंवर लोशन चोळल्याचे दिसून आले आणि सामनाधिकारी क्लॉईट लॉईड यांनी या प्रकरणी त्याच्यावर ५० टक्के मानधन कपातीचा दंड केला.
२०१०मध्ये पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदी चक्क मैदानातच चेंडूचा चावा घेताना आढळून आला. त्याने चेंडूंची शिवण उसवण्यासाठी हा प्रयत्न केला हे लपून राहिले नाही. हा सामना धर्म येमे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाला होता. शाहिद आफ्रिदीला या प्रकरणी दोन टी-20 सामन्यातून निलंबित करण्यात आले होते. २०१६मध्ये दक्षिण आफ्रिडेचा ड्युप्लेसिस याने दोनदा बॉल टेम्परिंग केल्या प्रकरणी दोषी आढळून आला.
त्यात पाकिस्तान संघाला धावा बहाल करण्यात आल्या व ५० टक्के मानधन कपातीचा दंड लगावला. ऑस्ट्रोलिया विरुद्ध होबार्ट कसोटीतही बॉल टेम्परिंग प्रकरणी मानधन कपातीचा दंड ठोठावला होता. क्रिकेटला जेंटलमन गेम्स म्हणतात. मात्र, अशा प्रकरणांमुळे या खेळाची प्रतिमा मलीन होत गेली. बॉल टेम्परिंग स्लेजिंग करणे, फिक्सिंग, भेट मैदानांवर खेळाडूशी हुज्जत घाट घालणे, दुसवणे अशा बर्याच विषयी क्रिकेटला गालबोट लागत गेले.
ऑस्ट्रेलिया संघाचे बरेच खेळाडू मैदानावर स्लेजिंग करत असतात. बॉल टेम्परिंग बाबत स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व बॅन्क्रॉफ्ट या तीनही खेळाडूना एक वर्षाची बंदी घातली होती. अशा खेळाडूंवर आजीवन बंदीची कारवाई केली असती तर दुसर्या खेळाडूनी बॉल टेम्परिंग व स्लेजिंग करण्याबाबत धाडस केले नसते.