मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर आणि अभिनेत्री कंगना रानौत एकेकाळी सहकलाकार होत्या. तनु वेड्स मनु चित्रपटात दोघीनी एकत्र काम केले होते. परंतु त्यानंतर समाजमाध्यमांवर दोघींचे एकमेकांसोबत वाकडे असल्याचे दिसून येत होते. आता स्वरा भास्करने राजकीय नेता फाहद अहमद याच्याशी विवाह केल्यानंतर मात्र कंगनाने स्वराचे अभिनंदन केले आहे.
कंगनाने दोघांचेही कौतुक करा लिहिले आहे,"तुम्ही दोघे सुखी आणि खुश दिसत आहेत ही देवाची करणी आहे. लग्न तर मनात होत असत. दोन मनाचं मिलन होतं असत. बाकी सगळं फक्त व्यवहार आहे. मनापासून प्रेम." असे म्हणत तिने २ हार्ट इमोटीकॉन्स सुद्धा जोडले आहेत.
कंगनाची शुभेच्छा वाचून तिचे कौतुक होताना दिसत आहे. तिच्या लग्नाचेही प्रश्न नेटकरी विचारात आहेत. मात्र यावर तिने काही भाष्य केलेले नाही.