न्यूयॉर्क : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात 50 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. या भूकंपात आतापर्यंत 28 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे तुर्कस्तान आणि सीरिया यांचे म्हणणे आहे.
भूकंपग्रस्त भागात मदतकार्य अतिशय वेगाने सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. भूकंपामुळे तुर्की आणि सीरियात शोककळेचे वातावरण आहे. भूकंपग्रस्त भागात एकीकडे बचाव कार्य सुरु असताना दुसरीकडे काही भागात लुटमारीच्या घटना घडत आहेत.