इस्तंबूल : तुर्कस्तान, सिरियातील विनाशकारी भूकंप बळींची संख्या आता तब्बल २५ हजारांवर पोहोचली आहे. याशिवाय, जखमी झालेल्या नागरिकांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. तर, मृतांच्या संख्येतही आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जसजसे दिवस उलटत आहेत तसतशी ढिगार्याखाली जिवंत व्यक्ती सापडण्याची आशा मावळत चालली आहे. तुर्कस्तानशिवाय युद्धग्रस्त सीरियात ३,३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.