'वंदे भारत एक्सप्रेस' महाराष्ट्राच्या विकासाचं एक प्रतिक! : पंतप्रधान

    10-Feb-2023
Total Views | 79

vande bharat
(Vande Bharat Express) 
मुंबई (Vande Bharat Express) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला. "वंदे भारत एक्सप्रेस देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या विकासाचं एक प्रतिक असून राज्यात सुरु झालेल्या दोन वंदे भारत ट्रेनमुळे राज्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्राला चालना नक्कीच मिळेल. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे.", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सीएसएमटी येथे आयोजित करण्यात आलेल्या वंदे भारतच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.
 
 
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ते म्हणाले, "देशात मोठ्या गतीने एकूण १० वंदे भारत सुरु झाल्याने रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. महाराष्ट्रात सुरु झालेल्या वंदे भारतचा विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. आजवर १७ राज्यांतील १०८ जिल्हे वंदे भारतने जोडले. महाराष्ट्रातल्या रेल्वेसाठी बजेटमध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आजचा दिवस मबाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असून डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्रात विकास वाढेल. राज्यात पर्यटन व तीर्थक्षेत्राला चालना मिळेल."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

Drugs Smuggler भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ज्यात त्यांना मोठे यश संपादन करता आले आहे, १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये समुद्रातून तस्करी करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे औषध मेथाम्फोटामाइन असण्याची शक्यता असून यासंदर्भात अजूनही चौकशी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121