नाशिक : “देशात सुरु असलेला ‘लव्ह जिहाद’ हा प्रेमाच्या नावाखाली एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून, त्याला रोखण्यासाठी सजग राहण्याची गरज आहे,” असे आवाहन दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले आहे.
नाशिक येथील श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे गुरुवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी दै. ‘मुंबई तरूण भारत’ आयोजित ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ या उपक्रमांतर्गत साळवी यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
भारतातील अनेक हिंदू तरूणींना फसवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आखाती देशातून पैसा येतो. ‘पीएफआय’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया)सारख्या संघटना त्यांचे काम पुढे नेत असल्याचे पुराव्यानिशी सिद्धदेखील झाले आहे, असे उदाहरण साळवी यांनी या वेळी दिले. या कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना साळवी पुढे म्हणाल्या, “आखाती देशातून आलेल्या फतव्यानुसार भारतातील हिंदू मुलींना फसविण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. त्यानुसार सौदी अरेबिया, कुवैत, इराणसारख्या देशातून पीएफआयसारख्या संघटनेला पैसा पुरविला जातो.
या पैशांद्वारे भारतातील काही धर्मांध नागरिकांची दिशाभूल करून हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे साळवी यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, ’‘भारतात आता उच्चशिक्षित तरूणींना फूस लावून त्यांचे शोषण वाढल्याच्या अनेक घडना पुढे येऊ लागल्या आहेत. या तरूणी स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्यांच्याकडून सर्वप्रकारच्या गरजादेखील पूर्ण होत आहे. तसेच या तरूणींचे ‘पॉर्न’ व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन धर्मांतरणही केले जात आहेत,” असे साळवी यांनी सांगितले.“भविष्याचा वेध घेत आपल्या समोरील आव्हानांना हिंदू तरूणींनी वेळीच ओळखून त्याला रोखण्यासाठीदेखील सज्ज राहावे,” असे आवाहनही साळवी यांनी केले.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. किरण शिंदे, पंचकर्म विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मंजुषा मोरे,डॉ. किरण शिंदे, संहिता व सिद्धांत विभागाच्या डॉ. भावना दंडे, ‘मार्गशीर्ष फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुजाता जोशी आदींसह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या वेळी होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थिनी ऋचा दातार हिने मानले.
मानसिक विकृतीविरोधात लढा
“ ‘लव्ह जिहाद’वर जनजागृती करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांना मनुवादी विचाराचे तसेच प्रेमाला विरोध करणारे असे संबोधले जाते. मात्र, ‘लव्ह जिहाद’ हा त्या मानसिक विकृतीविरोधात लढा आहे जो हिंदूंसह बौद्ध, शीख यांच्या मुलींना त्यांचे आयुष्य बरबाद होण्यापासून अपप्रवृत्तींविरोधात आहे,” असे योगिता साळवी यांनी सांगितले.