मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही हे दुखणं फार जुनं आहे – भरत जाधव

    09-Dec-2023
Total Views | 74

bharat jadhav 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : मालिका, नाटक आणि चित्रपट या तिनही माध्यमांतून प्रामुख्याने विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव यांचा 'लंडन मिसळ' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या मराठी चित्रपटांचा एकीकडे असणारा चढता आलेख तर दुसरीकडे एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या दोन मराठी चित्रपटांचा आमना-सामना यावर भरत जाधव यांनी महाएमटीबीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत हा मुद्दा फार जुना असल्याचे सांगत याबद्दल मी गेली अनेक वर्ष बोलत असल्याचेही भरत जाधव म्हणाले.
 
काय म्हणाले भरत जाधव?
 
मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही किंवा एकाच दिवशी दोन मराठी चित्रपट आमने सामने येतात आणि प्रेक्षक विभागला जातो किंवा प्रेक्षक चित्रपट पाहायला गर्दीच करत नाहीत हा मुद्दा गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. यावर आपले मंत मांडताना भरत जाधव म्हणाले की, “मधल्या काळात मी माझ्याच चित्रपटांच्या निर्मात्यांना सांगत होतो की माझे जर का ५ चित्रपच असतील तर कोणते कधी प्रदर्शित करावे याबद्दल मी त्यांना कल्पना द्यायचो. पण होतं असं की प्रत्येक दिग्दर्शकाला त्यांचाच चित्रपट खास आहे, कथानक सर्वश्रेष्ठ आहे असं वाटतं. त्यामुळे समंजसपणे जर का काम केलं तर काहीतरी तोडगा निघू शकतो. याशिवाय हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांनाही चित्रपटगृहे हवी असतात त्यामुळे ती स्पर्धा देखील दुसऱ्या बाजूला सुरुच आहे’, असे मत भरत यांनी व्यक्त केले. तसेच, महाएमटीबीच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना कोणताही मराठी चित्रपट असो तो चित्रपटगृहात जाऊनच पाहण्याचे आवाहन देखील केले.
 
दरम्यान, 'लंडन मिसळ' या चित्रपटात भरत जाधव, गौरव मोरे, ऋतुजा बागवे, रितीका श्रोत्री, माधुरी पवार, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ८ डिसेंबरला हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या ऑफरचा दावा करणारे रणजीत कासले आहेत कोण?

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या ऑफरचा दावा करणारे रणजीत कासले आहेत कोण?

गेल्या काही महिन्यांत बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापल्याचे पहायला मिळाले. मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सध्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर या प्रकरणातील त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणी पार पडलेल्या तिसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने "माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नसल्याने मला या खटल्यातून निर्दोष मुक्त करावे", असा अर्ज न्यायालयास दिला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121