मनोरूग्ण हुसेन इमामने केला निशावर हल्ला; काचेच्या बॉटलचा डोक्याच वार

    09-Dec-2023
Total Views | 77

Hussain Imam 
 
 
नवी मुंबई : नेरुळ येथील बसस्थानकावर बसची वाट पाहत असलेली महाविद्यालयीन विद्यार्थिनी निशा कुंभार (वय 21) हिच्यावर सोमवारी (4 डिसेंबर) एका अनोळखी व्यक्तीने हल्ला केला. हुसेन इमाम हसन शमशू (वय 26) असे आरोपीचे नाव असुन त्यास पोलिसांनी अटक केली आहे. हुसेन इमाम हसन शमशू हा नेरूळ परिसरात भिकारी असून त्याने काचेच्या बाटलीने निशावर हल्ला केला. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे. बाटलीने तिच्या डोक्यात वार केल्यानंतर त्याने तुटलेली बाटली तिच्या पोटात घुसवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणी जखमी झाली. सध्या तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
निशा कुंभार ही ऐरोली येथील रहिवासी असून तिचे सेमिस्टर परीक्षा केंद्र नेरूळ येथील महाविद्यालयात आहे. 4 डिसेंबर रोजी ती नेरूळ येथे महाविद्यालयात परीक्षेसाठी आली होती आणि त्यानंतर ती, तिची मैत्रिण खुशी कदम हिच्यासोबत बसस्थानकावर बसची वाट पाहत उभी होती. बसची वाट पाहत दोघेही परीक्षेबाबत चर्चा करत असताना अचानक दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती हातात काचेची बाटली घेऊन आला आणि त्याने बाटलीने निशाला तिच्या डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. निशाने प्रतिकार करताच बाटली फुटली. मात्र, अनोळखी व्यक्तीने तुटलेली बाटली निशाच्या पोटात घुसविण्याचा प्रयत्न केला. निशाने प्रतिकार केला पण कंबरेला आणि पोटाच्या खालच्या भागात जबर मार लागला.
 
घटनेदरम्यान, दोन व्यक्तींनी निशाला मदत केली. नेरळ पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि निशाला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याची ओळख पटवली. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे नाव हुसेन इमाम हसन शमशू असे आहे. नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले की, पोलीस पथकाने त्वरीत शोध घेऊन हल्लेखोराला पकडले. तो नेरळ परिसरातील भिकारी आहे. काही स्थानिक साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, तो अशा प्रकारे वागला कारण तो मानसिक आजारी होता.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121