राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 'या' पदाकरिता अर्ज मागविण्यास सुरुवात; आजच अर्ज करा

    09-Dec-2023
Total Views | 31
National Highways Authority of India Recruitment

मुंबई : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत अधिसूचनेनुसार सल्लागार, संयुक्त सल्लागार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामधील एकूण १८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागांकरिता अर्जदाराने ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा असून याकरिता अंतिम मुदत दि. ०४ जानेवारी २०२४ असणार आहे. त्याआधी अर्ज करणे बंधनकारक असेल.

तसेच, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत नियुक्त केल्या जाणाऱ्या सल्लागार/संयुक्त सल्लागार – विज्ञान गट विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. भरतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121