मुंबई : घाटकोपर बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साकिब नाचन याला एनआयएने ताब्यात घेतले आहे. एनआयने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये छापेमारी करत मोठी कारवाई केली. ही छापेमारी ४१ ठिकाणी करण्यात आली. यात १५ जणासह साकिबचाही समावेश होता.
ISIS या दहशतवादी संघटनेतर्फे आखण्यात येत असलेला कटविरोधात एनआयएने ही कारवाई केली आहे. देशात ISIS विचारधारा रुजवण्याचा यांचा कट असल्याचे तपास उघडकीस आले आहे.महाराष्ट्रातन ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, पुणे, मीरा-भाईंदर या भागांचा या छापेमारीत समावेश आहे. त्याशिवाय कर्नाटक राज्यातील एका जागीही छापा मारण्यात आला.