विधानसभा निकालातून सनातनविरोधकांना सणसणीत चपराक

    06-Dec-2023
Total Views | 189
Opposition Leader On Sanatan Dharma Statement

‘कोण भारतमाता? तिचा शोध घ्यावा लागेल’ यांसारखी बेजबाबदार आणि उद्दाम विधाने पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान करणार्‍या राहुल गांधींना मतदारांनी या निकालातून सणसणीत चपराक लगावली. मात्र, या निकालातून कोणताही धडा न घेता, द्रमुकच्या खासदाराने ‘गोमूत्रवाल्या राज्यांत भाजपचा विजय झाला,’ असे म्हणत हिंदू धर्म, सनातन संस्कृतीला अपमानित करण्याचा पुन्हा एकदा केविलवाणा प्रयत्न केला. तेव्हा विधानसभा निवडणूक निकालाप्रमाणेच आगामी लोकसभा निवडणुकीतही मतदारांनी अशा सनातनविरोधी नेत्यांना मतपेटीतून त्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे!

सनातन धर्मावर, भारतीय संस्कृतीवर आणि त्याच्या आचारविचारांवर सतत हल्ले करणे हे राहुल गांधी, त्यांचा काँग्रेस पक्ष आणि ‘इंडिया’ आघाडीच्या अनेक नेत्यांसाठी जणू एक नियमित प्रक्रिया बनली आहे. या सनातन समर्थकांच्या पाठिंब्यामुळेच बरीच वर्षं केंद्रात सत्ता आणि आजही काही राज्यांत सत्ता शिल्लक आहे, हे राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचे नेते मात्र खुशाल विसरतात. खेदाची बाब म्हणजे, शाश्वत मूल्यांवर आधारित आपल्या महान राष्ट्राच्या आणि जागतिक कल्याणासाठी जे काही चांगले उपक्रम असायला हवे होते, ते होऊ न देण्याचा अशा काही नतद्रष्ट राजकारण्यांचा दुष्ट खेळ समजून घ्यायला हवा.

‘भारतमाता की जय’वरुन पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान झालेला वाद एका नेत्याच्या महान भारतीय संस्कृतीच्या आकलनाची पातळी तसेच त्याची वरवरची विचार प्रक्रिया आणि १४० कोटी भारतीयांच्या कल्याणाप्रति असलेली उदासीनताच प्रतिबिंबित करुन गेला. जेव्हा आपण भारताला ‘माता’ म्हणून संबोधतो, तेव्हा आपण कुठल्या जमिनीच्या तुकड्याचा संदर्भ देत नाही, तर एका सजग, जीवंत देवतेचा संदर्भ घेतो, जो पिता आणि गुरू या दोघांच्याही गुणांना मूर्त रूप देतो. आई देवत्व, बिनशर्त प्रेम, काळजी, आपुलकी यांचे प्रतिनिधित्व करते आणि नेहमी सर्व मुलांचे कल्याण आणि शांतिमय जीवन असावे, अशीच इच्छा करते. अशा आईला कोण तुच्छ मानू शकेल? जेव्हा आपण ‘भारतमाता की जय’ म्हणतो, तेव्हा काही हजार लोकांना एकत्र करून हा नारा देण्यासाठी पैसे द्यायचे आणि घडवून आणायचे असे नाही. हा मुळीच हेतू नाही.

सनातन संस्कृती जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वरवरच्या घोषणा करण्यावर कधीही विश्वास ठेवत नाही, तर सर्व स्तरांतील लोकांना एकत्र करून सर्व व्यक्तींना मानसिक शांती, समाधान देण्याचे कार्य करते, जे आजच्या जगात दुर्मीळ आहे. ही सनातन संस्कृती सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीदेखील कार्य करते. प्रत्येक व्यक्तीचे उत्थान, सामाजिक समरसता, सीमांचे रक्षण करणे आणि पर्यावरणाची काळजी घेणे हीदेखील याच सनातन संस्कृतीची मूलभूत वैशिष्ट्ये. म्हणूनच जेव्हा कोणी ‘भारतमाता की जय’ म्हणते, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे, ते सर्व व्यक्तींच्या कल्याणासाठी आणि सर्वार्थाने राष्ट्राच्या सुरक्षा आणि विकासासाठी आहे, म्हणूनच आपण ‘जय’ असा शब्दप्रयोग करतो. पण, हे राहुल गांधींच्या डोक्यात शिरेल एवढी त्यांची समज नक्कीच नाही आणि म्हणूनच तीन राज्यातील जनतेने काँग्रेसला साफ नाकारले आणि ‘राष्ट्र प्रथम’ विचारांवर चालणार्‍या भाजपला मतदान केले.

संपूर्ण इतिहास बघितला, तर आक्रमणकर्त्यांनी अनेक संस्कृती नष्ट केल्या. परंतु, केवळ सनातनी संस्कृती २००हून अधिक हल्ल्यांनंतर आजही तितक्याच मजबूतपणे उभी आहे. सखोल अभ्यास केल्यास हे लक्षात येईल की, सनातन संस्कृती ही केवळ कल्पना किंवा फक्त विचार नाही, तर एक वास्तविक सत्य आहे, जे व्यावहारिकदृष्ट्या कार्य करते आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना विकसित करते. ही विशाल संस्कृती एक राष्ट्र म्हणून भारताप्रति कृतज्ञतेची भावना वाढवते. ‘मी जीवनात जे काही मिळवले आहे, ते या गौरवशाली राष्ट्रामुळे आणि समाज आणि राष्ट्राच्या हितासाठी, राष्ट्राची सुरक्षिततेसाठी योग्य कृती करण्याचा माझा निर्धार आहे आणि ते करणे ही माझी जबाबदारी आहे,’ असे ही महान संस्कृती खोलवर रूजवते आणि म्हणूनच ‘भारतमाता की जय’ ही घोषणा अंगात सकारात्मक शक्तीचा एकप्रकारे संचय-संचार करते.

ज्यांनी पाश्चिमात्य सभ्यतेला महत्त्व दिले व तीच मूल्ये अमलात आणून सनातन धर्म आणि संस्कृतीचा अपमान व अनादर केला, त्यांनी सांगावे की, या पाश्चात्य सभ्यतेने मानवतेचे काय भले केले? जगभरात वारंवार होणारी युद्धे, दोन महायुद्धे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण, विकसनशील आणि गरीब देशांचे शोषण, सामाजिक असमतोल, नक्षलवाद, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या आणि दहशतवादात झपाट्याने होणारी वाढ, मनःशांती गमावणे, अमली पदार्थ ही सगळे पाश्चात्य संस्कृतीची देणी म्हणता येतील. अमली पदार्थांचे सेवन, आत्महत्या, सत्तेचे केंद्रीकरण, धर्मांतरण, कुटुंबव्यवस्था नष्ट होणे यांमुळे घटस्फोटाचे वाढते प्रमाण हेदेखील पाश्चात्य संस्कृतीचेच दुष्परिणाम. मग अशा या समाजाला नुकसान पोहोचवणार्‍या पाश्चात्य सभ्यतेचा भाग बनून आपल्याला राहायचे आहे का? काहीजण असा दावा करतील की, पाश्चात्यांमुळे वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती झाली की. परंतु, सत्य हे आहे की, वैज्ञानिक-तांत्रिक बदल ही एक सतत घडणारी घटना आहे, जी पाश्चात्य संस्कृतीची पर्वा न करता घडते. यावर संशोधन नक्कीच करायला पाहिजे. एक हजार वर्षांअगोदरची वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती भारतात पाहायला मिळते आणि त्यावेळी सनातन संस्कृतीने संपूर्ण जगाला शांती, प्रेम आणि आपुलकी प्रदान केली होती. तसेच पर्यावरण रक्षणाचा बहुमूल्य संदेशदेखील दिला होता.

काही राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते भारतीय संस्कृतीला आजही तुच्छ लेखतात. भारताला पाकिस्तान, अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, तुर्कस्तान, युक्रेन किंवा अनेक वर्षे जपलेल्या चुकीच्या संस्कृतीमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या काही युरोपीय देशांप्रमाणे भारताला नामोहरम करण्याचा त्यांचा डाव आहे का? एक जग म्हणून आपण हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की, प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा किंवा धर्म राखला गेला पाहिजे. परंतु, प्रत्येकाने एकजूट राहून, सनातन धर्माच्या तत्त्वांचे शतकानुशतके पालन केले पाहिजे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला अपेक्षित परिणाम प्रत्यक्षात येतात की नाही, हे पाहता येईल. सनातन संस्कृतीच्या समर्थनार्थ जगातील सत्पुरुषांनी धैर्याने पुढे आले पाहिजे.

सनातन संस्कृतीचा दुरूपयोग करणार्‍या या राजकारण्यांचे घाणेरडे राजकारण भारतीय मतदारांनी समजून घ्यावे. ही एकवेळची घटना नाही. लोकांचे ’ब्रेनवॉश’ करणे आणि त्यांना औपनिवेशिक मानसिकतेत फसवणे, ही या राजकारण्यांची एक नियमित प्रक्रिया आहे, जी गुलामगिरीच्या मानसिकतेपेक्षा कमी नाही.काँग्रेस सरकारने भगवान श्रीराम यांचे काल्पनिक व्यक्तिमत्त्व म्हणून वर्णन केल्याचे वास्तव, समाजवादी पक्षाच्या नेत्याने ’रामचरितमानस’वर केलेला हल्ला, हिंदू सण आणि सांस्कृतिक प्रथा यांच्या विरोधात खोट्या कथा, ऋषी-मुनींवर विध्वंसक टीका आणि दहशतवादाला समर्थन अशी शेकडो उदाहरणे आहेत. ‘हमास’सारख्या दहशतवादी संघटनेचे समर्थन करणारे, चुकीची संस्कृती आणि सामाजिक विनाश घडवून आणणार्‍यांना समर्थन आणि मदतकरणार्‍या अशा नेते आणि राजकीय पक्षांना धडा हा शिकवलाच पाहिजे.

भारतीय मतदारांनी काळजी घेतली पाहिजे आणि भविष्यातील निवडणुकांमध्ये या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना दाखवून दिले पाहिजे की, राष्ट्र आणि भारतीय संस्कृतीपेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नाही. प्रत्येकाने आपली जात, पंथ आणि स्वार्थी वृत्ती यांसारख्या छोट्या-छोट्या ओळखी बाजूला ठेवून, सनातन धर्माच्या तत्त्वावर एकत्र येऊन २०४७ पर्यंत आपले राष्ट्र प्रत्येक बाबतीत बलवान ठरेल, असे कार्य करूया, जेणेकरून आपला देशच नाही, तर ही वसंधुरा जगण्यासाठी एक सर्वोत्तम स्थान ठरेल.
पंकज जयस्वाल 
७८७५२१२१६१
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121