मूडीजने दिला चीनला धक्का; २०१७ नंतर पहिल्यांदाच कमी केली क्रेडिट रेटिंग
06-Dec-2023
Total Views | 84
मुंबई : क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने चीनला चांगलाच धक्का दिला आहे. अर्थव्यवस्थेतील मंदी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील जोखमीचा दाखला देत, क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने चीनच्या सरकारी क्रेडिट रेटिंगचा दृष्टीकोन स्थिर वरून नकारात्मक केला आहे. २०१७ नंतर चीन सरकारची क्रेडिट रेटिंग कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मूडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या दिवाळखोरीमुळे चिनी बँका संकटात सापडल्या आहेत. त्याचबरोबर मूडीजने चीन च्या जीडीपी वाढीचा अंदाज देखील कमी केला आहे. मूडीजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, २०२४-२५ या आर्थिक वर्षात चीनची अर्थव्यवस्था ४ टक्के दराने वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मूडीजच्या अहवालात चीनच्या वृद्ध होत चाललेल्या लोकसंख्येवर सुद्धा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चीनमध्ये वाढत्या वृध्द लोकसंख्येमुळे २०३० पर्यंत संभाव्य वाढ सुमारे ३.५ टक्क्यांनी कमी होईल, असे मूडीजने म्हटले आहे. याउलट आपल्या रिपोर्टमध्ये मूडीजने भारतीय बँकाचा नफा वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे.