मुंबई : दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख डॅा. विशाल कडणे यांनी कोकणातील ज्वेलरी व सुवर्णकार व्यावसायिक यांच्या शिष्टमंडळासह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांची ठाणे येथील निवासस्थानी सदीच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान सिंधुदुर्गातील सुवर्णकारांच्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. सुशिक्षित सुवर्णकार बांधवांना ज्वेलरी व्यवसायामध्ये उद्भवणार्या विविध प्रश्नावर आ. डावखरे यांनी मार्गदर्शन केले.
सोने चोरी बाबतच्या विविध प्रकरणांमध्ये कर्नाटक पोलिसांकडुन महाराष्ट्रातील सुवर्णकारांना झालेल्या त्रासाबद्द्ल गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान आ डावखरे यांनी प्रश्न विचारुन सातत्याने विषय लावून धरला होता. अडचणीच्या वेळी सुवर्र्ण कारासोबत उभे राहुन त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्ल कणकवलीहुन आलेल्या सुवर्ण व्यावसायिकांनी डावखरे यांचे आभार मानले.
हिवाळी अधिवेशनामध्ये पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणुन रोजगार व उद्योग बाबतीत नवनवीन उपाययोजना आणणेबाबत आ. निरंजन डावखरे नेहमीच अग्रेसर असतात आणि गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे कोकणातील पदवीधर मतदारसंघामध्ये प्रसन्न वातावरण असुन त्याबद्दल आ डावखरे यांचे आभार मानन्यासाठी आज कोकणातील व्यावसायिक तरुणांचे शिष्टमंडळ आज डावखरे यांच्या भेटीला आले असल्याचे दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशन संचालक विशाल कडणे यांनी सांगितले. भेटीदरम्यान आ निरंजन डावखरे यांचा शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.