भारताचा आर्थिक विकासदर ६.८ टक्के राहिल - सीआयआयचा अंदाज
06-Dec-2023
Total Views | 35
नवी दिल्ली : भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) ने चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ६.८ टक्के राहिल, असा अंदाज वर्तवला आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या मते, पायाभूत सुविधांच्या वाढीवर आणि व्यवसाय करण्यास सुलभतेला चालना देण्यावर सरकारचे लक्ष केंद्रित आहे, त्यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर सात टक्क्यांवर पोहोचेल.
सीआआयआयने याआधी ६.५ ते ६.७ टक्के विकासदराचा अंदाज बांधला होता. आधीच्या अंदाजात सुधारणा करुन सीआयआयने २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी विकासदराचे नविन अंदाज जाहीर केले आहेत. यासोबतच सीआयआयने सरकारी धोरणातील सातत्यांचे स्वागत केले आहे.