मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनीनिमित्त दि. 5 आणि 6 डिसेंबर रोजी 50 हून अधिक पुस्तक विक्रीचे स्टॅाल दादर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर उभारण्यात आले होते. तसेच ‘बार्टी’, पुणे यांच्यामार्फत पुस्तक स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलवर पुस्तक खरेदीवर 85 टक्के सूट देण्यात आली होती.
भारताचे संविधान, बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकांना विशेष मागणी होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले सर्व खंड तसेच चांगदेव खैरमोडे यांचे आणि बी.सी. कांबळे यांचे खंड विक्रीस ठेवण्यास आले आहेत. त्याचबरोबर भारतीय संविधान, जातीव्यवस्थेचे निर्मूलन ही पुस्तकेदेखील पुस्तक स्टॉलवर उपल्बध होती.
ज्यांची किमान किंमत 60 रुपयांपासून सुरू होते. त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक लहानमोठे प्रकाशनांनी, विक्रेत्यांनी शिवाजी पार्कवर हिंदी, मराठी, इंग्रजी अशा भाषेतील पुस्तक विक्रीचे स्टॉल उभारले होते. लाखो पुस्तक विक्री झाल्याचा अंदाज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयांयी जत्रेत गेल्यावर फुग्यांची खरेदी करत नाही, तर पुस्तकांची खरेदी करतात. त्यामुळेच ही एक वैचारिक क्रांती आहे.- सत्येंद्रनाथ चव्हाण, विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)
दरवर्षीपेक्षा यावर्षीचा लोकांचा पुस्तक विक्रीचा कल वाढलेला आहे. त्यात ‘पद्मश्री’ रमेश पंतगे यांची तसेच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात झालेली आहे.- मकरंद ताम्हाणकर, व्यवस्थापक, ज्ञानम् प्रकाशन.