मिझोराममध्ये सत्तापरिवर्तन, जोरम पीपल्स मुव्हमेंटला स्पष्ट बहुमत

    04-Dec-2023
Total Views | 47
Mizoram Assembly Election 2023

नवी दिल्ली :
मिझोराममध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास ३० ते ३५ वर्षांनी परिवर्तन झाले मणिपूर हिंसाचाराची छाया दिसून आली. राज्यात काँग्रेसला अवघी एक १ जागा मिळाली आहे. त्याचवेळी मिझो नॅशनल फ्रंटचा (एमएनएफ) एकछत्री अंमल संपून जोरम पीपल्स मुव्हमेंटचा (झेडपीएम) सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

मिझोरामच्या ४० सदस्यांच्या विधानसभेमध्ये झेडपीएमला २७ जागांवर दणदणीत विजय मिळाला आहे. त्याचवेळी एमएनएफला केवळ दहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. एवढेच नव्हे तर मिझोरामचे दीर्घकाळ मुख्यमंत्रीपद सांभाळणारे झोरामथांगा यांचा पराभव झाला आहे. मिझोराममध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. भाजपला दोन जागांवर यश मिळाले आहे.

गेल्या ३० वर्षात मिझोरामच्या मुख्यमंत्रीपदी नवा पक्ष येण्याची ही पहिलीच वेळ आहे 1984 पासून मिझोराममधील सत्ता काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात फिरत होती. 1989 पासून काँग्रेसचे ललथनहवला आणि एमएनएफ झोरमथांगा हे एकामागून एक मुख्यमंत्री होत होते. यावेळी मिझोरामला झेडपीएम यांच्या लालदुहोमाच्या रूपाने नवा मुख्यमंत्री मिळू शकतो. लालदुहोमा यांनी बुधवारी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे.
 
झेडपीएम हा पक्ष सहा प्रादेशिक पक्षांच्या एकत्रिकरणातून स्थापन झाला आहे. त्यामध्ये मिझोरम पीपल्स कॉन्फरन्स, झोरम नॅशनलिस्ट पार्टी, झोरम एक्सोडस मूव्हमेंट, झोरम रिफॉर्मेशन फ्रंट आणि मिझोराम पीपल्स पार्टी यांचा समावेश होता. हे पक्ष नंतर 2018 मध्ये अधिकृतपणे जोरम पीपल्स मूव्हमेंट म्हणून राजकारणात सक्रीय झाले. एमएनएफ आणि काँग्रेसला पर्याय म्हणून झेडपीएमने स्वत:ला प्रस्थापित करण्यास प्रारंभ केला. मात्र, २०१८ साली निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली नसल्याने झेडपीएमच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवाली लागली होती, त्यावेळी ८ जागांवर विजय मिळविला होता.
 
पुढे २०१९ साली झेडपीएमला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली. एमएनएफच्या राजकारणास विरोध करण्याचे धोरण झेडपीएमने ठेवले आहे. केंद्र सरकारशी जुळवून घेण्याच्या एमएनएफच्या धोरणास झेडपीएमने विशेष लक्ष्य केले. मणिपूर हिंसाचारामुळे ख्रिश्चन समुदाय संतप्त असल्यचे सांगण्यात येते. त्यामुळे भाजपसोबत आघाडीमध्ये असलेल्या एमएनएफ विरोधात नाराजी वाढली होती. ही नाराजी आपल्याकडे वळविण्यात झेडपीएमला यश आल्याचे मानले जात आहे.
 
मिझोराम विधानसभा निवडणुकीत यावेळी मिझोराममध्ये भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे. राहुल गांधींनी आयझॉलमध्ये रोड शोही केला होता, मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. काँग्रेसला 20.82 टक्के मते मिळाली आहेत. भाजपला 5.06 मते मिळाली आहेत. सत्ता मिळविणाऱ्या झेडपीएमला 37.88 टक्के मते मिळाली असून एमएनएफला ३५.१० टक्के मते मिळाली आहेत.

इंदिरा गांधींचे सुरक्षा प्रभारी ते राज्याचे नेतृत्व
 
झेडपीएमचे सर्वेसर्वा लालदुहोमा यांचा राज्यातील प्रभाव या निवडणुकीत सिद्ध झाला आहे. लालदुहोमा हे 1977 मध्ये आयपीएस झाले आणि त्यांनी गोव्यात स्क्वाड लीडर म्हणून काम केले. या काळात त्यांनी तस्करांविरोधात अनेक कारवाया केल्या होत्या. त्यानंतर 1982 मध्ये त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी लालदुहोमा यांनी 1984 मध्ये राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि 1984 मध्ये ते खासदार झाले. त्यानंतर अवघ्या चार वर्षांनंतर 1988 मध्ये काँग्रेसचे सदस्यत्व सोडल्यामुळे त्यांना लोकसभेतून अपात्र घोषित करण्यात आले होते. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपात्र ठरलेले लालदुहोमा हे पहिले खासदार ठरले होते.
 
अग्रलेख
जरुर वाचा
बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका

बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका

वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले असूनही पश्चिम बंगालमध्ये त्या विरोधात हिंसाचार सातत्याने वाढत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात इस्लामिक कट्टरपंथींचा उन्मात शिगेला पोहोचला. हिंदूंना लक्ष्य करून कट्टरपंथीयांकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार टीका केली आहे. त्या राज्यात जातीय तेढ पसरवत असून बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका बनल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Mithun Chakraborty..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121