पाणबुडी प्रकल्प राज्यातच राहणार! मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही
31-Dec-2023
Total Views | 49
मुंबई : सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप उबाठा गटाकडून केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकल्प राज्याचा असून तो बाहेर जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार वैभव नाईक यांनी पाणबुडी प्रकल्प गुजरातला जात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत बोलताना म्हणाले की, "मी सकाळीच उदय सामंत यांच्याशी बोललो आहे. हा प्रकल्प राज्याचा आहे आणि तो राज्यातून बाहेर जाणार नाही याची खात्री बाळगा," असे त्यांनी सांगितले. तसेच येत्या १२ तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्पाचे उद्धाटन होणार आहे," असेही ते म्हणाले आहेत.