देवेंद्र फडणवीस यांना एक मेसेज आणि काठमांडूला अडकलेल्या ५८ भाविकांची झाली सुटका

काठमांडूमध्ये देवेंद्रच आमच्या मदतीला धावून आले पर्यटकांनी व्यक्त केली कृतज्ञ भावना

    29-Dec-2023
Total Views | 510
nepal tourist
 
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एका फोनवर नेपाळ मध्ये अडकलेल्या ५८ मुंबईतील नागरीकांना सुखरुप परत आणले आहे. पनवेल तालुक्यातील कामोठे येथील हे नागरीक नेपाळ मध्ये तीर्थयात्रेसाठी गेले असता त्यांना तीथे काही लोकांकडून डांबून ठेवण्यात आले या प्रसंगी त्यांना या संकटातून सोडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
पैसे नाहीत, पर्यटन कंपनीने हात वर करून नेपाळमध्ये अडकवून ठेवलेले. अनेक नेत्यांना आणि त्यांच्या पीएंना फोन करून मदतीची याचना करूनही प्रतिसाद मिळेना. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फक्त एक मेसेज केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा हलविली. नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत अक्षरश: व्हीआयपी ट्रिटमेंट मिळून हे भाविक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचले. काठमांडूमध्ये देवेंद्रच आमच्या मदतीला धावून आले अशी कृतज्ञ भावना या पर्यटकांनी व्यक्त केली.
 

nepal 
 
नेमक काय घडलं
रायगड जिल्ह्यातील पनवेल मधल्या कामोठे येथून ५८ प्रवासी तीर्थयात्रेसाठी गेले होते. ज्यात ३५ महीला आणि २३ पुरुष होते. लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेत ते काठमांडूला पोहोचले. पण तेथे पोहोचल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्यच्या बसमध्ये भरण्यात आले. व त्यांच्याकडून तूमच्या टूर कंपनीने पैसे भरले नाहीत असे म्हणत सहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे भरले नाहीत तर सोडणार नाही असे ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी धमकावयला सुरूवात केली.
  
अशावेळी अनेकांकडून मदतीसाठी प्रयत्न करुनही जेव्हा प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करत घडलेल्या प्रकाराची माहीती दिली. त्यावर लगेचच त्यांचा प्रतिसाद आला. फडणवीसांचे सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी भाविकांशी संपर्क साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहायक संदीप राणा यांना कळविले. राणा मुळचे नेपाळचे आहेत. त्यांनी लगेचच भाविकांची मदत करुन त्यांना सुखरुप गोरखपुर पर्यंत पोहोचवले. फडणवीसांनी आधीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून सर्वांच्या राहण्याची व्यवस्था केली होती.
 
nepal tourist
 
गोरखपुरवरुन पनवेलला भाविकांना परत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत रेल्वेची खास बोगी जोडण्याची विनंती केली. त्यावर अश्विनी वैष्णव यांनी मुंबईला येणाऱ्या ट्रेन ला एक डबा आरक्षित करुन सर्व भाविकांना सुखरुप घरी पोहोचवले.
 
nepal tourist  
 
अत्यंत कठीण परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीमुळे भाविक भारावून गेले होते. अनेक नेत्यांशी संपर्क साधला. परंतु, कोणीही मदत केली नाही. पण एका मेसेजवर देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीला धावून आले. नेपाळपासून ते उत्तरप्रदेशपर्यंत आपल्या संपर्काचा वापर करून आम्हाला सुखरुपपणे घरी पोहोचविले अशी कृतज्ञ भावना भाविकांनी व्यक्त केली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121