"देवेंद्र फडणवीस हे एक अद्भुत व्यक्तिमत्त्व";जपानच्या राजदूतांचे कौतुकोद्गार
जपानचे मुंबईतील महावाणिज्य दूत डॉ. फुकाहोरी यासुकाता यांचे फडणवीसांसाठी गौरवोद्गार
26-Dec-2023
Total Views | 391
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या 'कोयासन विद्यापीठा'तर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुकाता यांचे संपुर्ण भाषण..
मी येथे जपानचा मुंबईतील महावाणिज्यदूत म्हणून उपस्थित आहे, हे माझे भाग्य आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल मी जपान सरकारच्यावतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. मला वाटतं की, कोयासान विद्यापीठाने भारतातील एखाद्या व्यक्तीला डॉक्टरेट देण्याचे महत्त्व तुमच्या लक्षात आले नसेल. कारण, मागच्या १२० वर्षात कोयासान विद्यापीठाने कोणालाही मानद डॉक्टरेटची उपाधी दिलेली नाही. कोयासान विद्यापीठाचा इतिहास १२०० वर्षे जूना आहे. कोयासन विद्यापीठ ही जपानमधील एक प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहे. कोसायान विद्यापाठाने १२० नाही, तर १२०० वर्षात प्रथमच भारतातील एका अद्भुत व्यक्तीला मानद डॉक्टरेट दिली आहे.
भारतीयांना कोयासान विद्यापीठाची तितकीशी ओळख नसेल, पण जपानमध्ये या विद्यापीठाची ओळख बुद्धिजमचे माहेरघर म्हणून आहे. या विद्यापीठाची स्थापना कोबोडाईशी कुकाई यांनी नवव्या शतकात केली होती. कुकाई यांची ओळख सांगायची झाल्यास ते भारतातील आदि शंकाराचार्य यांच्यासारखेच होते. आदि शंकराचार्य यांनी हिंदू धर्माचा प्रचार केला. तसाच प्रचार कुकाई यांनी सहाव्या शतकात भारतातून जपानमध्ये आलेल्या बुद्ध धर्माचा केला. कुकाई यांच्या योगदानामुळे बुद्ध धर्म हा जपानचा राष्ट्रीय धर्म झाला. त्यानंतर कोयासान विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. त्यामुळेच जपानी लोकांच्या दृष्टीने कोयासान विद्यापीठाचे मोठे महत्त्व आहे. ही घटनासुद्धा जपानसाठी आणि भारतीय नागरिकांसाठी तितकीच महत्त्वपूर्ण आहे.
कोयासान विद्यापीठ आपल्या इतिहासात पहिल्यांदाच मानद डॉक्टरेट देत आहे, हे ऐकून मलासुद्धा आश्चर्य झाले. त्यानंतर मला कळले की, ही डॉक्टरेट दुसऱ्या कुणाला नाही, तर देवेंद्र फडणवीस यांना दिली जात आहे. यावर्षी ते जपान सरकारचे विशेष आतिथी म्हणून जपानच्या दौऱ्यावर आले होते. आपल्या उर्जावान जपान दौऱ्यात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या भेटी घेतल्या. विशेषता जपान दौऱ्यात त्यांनी व्यावसायिक बैठका घेतल्या. तसेच त्यांनी जपानमधील उद्योजकांच्या भेटी घेतल्या आणि महाराष्ट्र हे गुंतवणूकीसाठी भारतातील सर्वोत्तम राज्य आहे हे त्यांना समजून सांगितले. देवेंद्र फडणवीसांच्या या दौऱ्यामुळे अनेक जपानी कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने ते महाराष्ट्रातील सर्वोत्तम नेते आहेत. यासोबतच ते चांगल्या व्यक्तीमत्वाचेही धनी आहेत. त्यांच्या जपान दौऱ्याच्या नियोजनावेळी मला त्यांना भेटण्याचा अनेकदा योग आला. मी त्यांच्यातली मानवी मूल्ये पाहून प्रभावित झालो. त्यामुळेच कोयासान विद्यापीठाने ही मानद पदवी वैज्ञानिक कामगिरीसाठी किंवा आणखी कोणत्या यशासाठी न देता फक्त मानवतेच्या सेवेसाठी दिली आहे. कोयासान विद्यापीठाने देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या देशातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील लोककल्याणकारी कामांची दखल घेऊन, हा सन्मान त्यांना दिला आहे. मी पुन्हा एकदा जपान सरकारच्या आणि माझ्यावतीने देवेंद्र फडणवीसांचे हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद!