धुक्यातही रेल्वे गाड्या सुसाट धावणार; अत्याधुनिक यंत्रणेमुळे खोळंबा टळणार

    25-Dec-2023
Total Views |
Railway Advanced GPS Technology Signal System
 
मुंबई : हिवाळ्यात धुक्यामुळे सिग्नलची दृश्यमानता कमी असते. अनेकदा दाट धुक्यामुळे रेल्वे गाड्या कमी वेगाने धावतात. परिणामी, रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होतो. तर कमी दृश्यमानतेमुळे सिग्नल लक्षात न येण्याने जोखीम वाढते. हे टाळण्यासाठी मध्य रेल्वेने धुके सुरक्षा यंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. धुक्याच्या वातावरणात रेल्वेच्या सुरक्षेसाठी ही यंत्रे महत्वाची ठरतील. सद्यस्थितीत मध्य रेल्वेने ४९७ उपकरणांचे वितरण केले आहे. तथापि,आणखी ५०० उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आले आहे.

नाविन्यपूर्ण सुविधांनी सुसज्ज यंत्रे

ही यंत्र धुके जीपीएस तंत्रज्ञानावर चालतात. ही यंत्रणा रेल्वे चालकांना आगामी तीन सिग्नल्सबाबत ऑडिओ आणि व्हिज्युअल संकेतांद्वारे आगाऊ सूचना देतात. तसेच, हे उपकरण केवळ पुढील सिग्नलचे वर्णन दाखवत नाही तर इंजिन आणि सिग्नलमधील अंतरदेखील सांगतात. या यंत्रणेत चलन मार्गावरील सर्व सिग्नल्स आणि लेव्हल क्रॉसिंग गेट्स जीपीएस स्थानांद्वारे काळजीपूर्वक मॅप केले गेले आहेत. या यंत्रांमुळे वास्तविक स्थानाच्या ५०० मीटर आधी सिग्नलची दिशा जाहीर करून रेल्वे चालकांना त्यांच्या गाड्या सुरक्षितपणे हाताळण्यासाठी सतर्क आणि सुसज्ज राहण्यास मदत होते. ही यंत्र उजव्या हाताच्या बाजूला (RHS) स्थित धोक्याच्या सिग्नलवर विशेष लक्ष देतात आणि सुरक्षा उपायांची माहिती देतात. धुक्यामुळे कमी दृश्यमानतेच्या घटनांमध्ये ट्रेनचा वेग सामान्यतः ३०-६० किमी प्रतितास दरम्यान असतो. तथापि, फॉग सेफ्टी डिव्हाईसच्या अंमलबजावणीमुळे जास्तीत जास्त ७५ किमी प्रतितास वेग मिळू शकतो, ज्यामुळे ट्रेनचा खोळंबा होण्याचा कालावधी कमी होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
 
विभागनिहाय वितरण खालीलप्रमाणे

• मुंबई विभाग: १० उपकरणे
 
• भुसावळ विभाग: २४८ उपकरणे
 
• नागपूर विभाग: २२० उपकरणे
 
• सोलापूर विभाग: ९ उपकरणे
 
• पुणे विभाग: १० उपकरणे

भविष्यातील ५०० उपकरणांचे वितरण पुढीलप्रमाणे

पुणे विभाग- ८०
 
भुसावळ विभाग- १००
 
सोलापूर विभाग- ८०
 
नागपूर विभाग- १२०

मुंबई विभाग- १२०
अग्रलेख
जरुर वाचा
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा : ‘नाना पालकर स्मृती समिती’ची पथदर्शी वाटचाल

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा : ‘नाना पालकर स्मृती समिती’ची पथदर्शी वाटचाल

Dr. Paresh Navalkar Interview ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या विचाराने कार्यरत ‘नाना पालकर स्मृति समिती’ गंभीर आजाराने ग्रासलेल्या गरीब व गरजू रुग्णांना प्रामाणिकपणे व ध्येयासक्त वृत्तीने वैद्यकीय मदत देण्यास समर्पित आणि वचनबद्ध आहे. गेली 57 वर्षे अविरतपणे समिती रुग्णसेवेचे कार्य करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ प्रचारक असलेले नारायण पालकर उपाख्य नाना पालकर यांच्या निधनानंतर त्यांचे रुग्णसेवेचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आज अनेक कार्यकर्ते समितीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. जागतिक आरोग्य ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121