लाल समुद्रात भारताच्या तेलवाहू जहाजावर हल्ला; अमेरिकन नौदलाचा हुथी बंडखोरांवर आरोप
24-Dec-2023
Total Views | 150
नवी दिल्ली : यमनमधील हुथी बंडखोरांनी दि. २४ डिसेंबर रविवारी सकाळी लाल समुद्रात तेल वाहून नेणाऱ्या आणखी एका जहाजाला लक्ष्य केले आहे. या जहाजावर भारताचा ध्वज होता. अशी माहिती अमेरिकेच्या नौदलाने दिली आहे. या जहाजावर हुथी बंडखोरांकडून ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. ड्रोन हल्लानंतर तेलवाहू जहाजाने लाल समुद्रात उपस्थित असलेल्या अमेरिकन युद्धनौकेला धोक्याचा इशारा पाठवण्यात आला होता.
अमेरिकन लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार, "लाल समुद्रात भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर हुथी बंडखोरांकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही." इस्रायल-हमास युद्धामध्ये हुथी बंडखोरांनी हमासच्या समर्थनात इस्रायलवल रॉकेट हल्ले केले आहेत. त्याबरोबरच इस्रायलशी संबंधित मालवाहू जहाजांवर हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. पण याची व्यापकता वाढत आहे. त्यामुळे या भागातून होणारी मालवाहतूक प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.