लाल समुद्रात हुथींनी हल्ला केलेल्या जहाजावर भारतीय ध्वज नव्हता - भारतीय नौदलाची माहिती
24-Dec-2023
Total Views | 119
नवी दिल्ली : हुथी बंडखोरांनी ड्रोनद्वारे लक्ष्य केलेल्या गॅबॉन जहाजावर भारतीय ध्वज नव्हता, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. दि.२४ डिसेंबर रविवारी सकाळी लाल समुद्रात एक मालवाहू जहाजावर हुथी बंडखोरांकडून ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची माहिती देताना, अमेरिकी नौदलाने मालवाहू जहाजावर भारतीय ध्वज असल्याचा दावा केला होता. पण आता भारतीय हवाई दलाने अमेरिकी नौदलाचा दावा फेटाळला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मालवाहू जहाजाच्या चालक दलात २५ भारतीय होते, जे आता सुरक्षित आहेत. हुथी बंडखोरांकडून लाल समुद्रात मालवाहू जहाजांवर हल्ले केले जात आहेत. विशेषता, हमासच्या समर्थनात हुथी बंडखोर इस्रायलशी संबंधित जहाजांवर हल्ले करत आहेत. इस्रायल-हमास युद्ध सुरु झाल्यापासून हुथी बंडखोरांनी जवळपास १५ जहाजांवर हल्ला केला आहे.