ब्रम्हपूरीत विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू; यंदा राज्यात ४८ वाघांचा मृत्यू
22-Dec-2023
Total Views | 62
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यात विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि २१ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या वाघाच्या मृत्यूने यंदा राज्यात मृत्यूमुखी पडलेल्या वाघांची संख्या ४८ वर गेली आहे. (chandrapur tiger)
ब्रह्मपुरी तालुक्यात सिंदेवाही वन परिक्षेत्रातील डोंगरगाव बिटामधील मेंढा माल, येथील एका खासगी शेतशिवारात गुरुवारी नर वाघ मृतावस्थेत आढळला. शेतावर गेलेल्या शेतकऱ्याला मृता अवस्थेत हा वाघ दिसला. वाघाच्या तोंडाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. मृत वाघ अंदाजे अडीच ते तीन वर्ष असून तो नर वाघ आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरात विहीरीत पडून वाघाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याने राज्यात यंदा मृत्यूमुखी पडलेल्या वाघांची संख्या ४८ वर गेली आहे.