मुंबई : 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना विविध पदांकरिता अर्ज करता येणार आहे. तसेच, भारत इलेक्टॉनिक्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अधिसूचनेनुसार शैक्षणिक पात्रता, अर्जशुल्क, वयोमर्यादा त्याचबरोबर वेतनासंबंधी अधिक तपशील जाणून घेऊयात.
'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'मध्ये पदभरतीद्वारे विविध रिक्त पदांच्या ५२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. दरम्यान, अधिसूचनेनुसार, प्रशिक्षणार्थी अभियंता – I(२०), प्रकल्प अभियंता – I(३०), प्रकल्प अधिकारी –I(१), प्रकल्प अभियंता- I(साहित्य व्यवस्थापन)(१) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तसेच, पात्र उमेदवारांना सदर पदांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२३ असणार आहे. प्रशिक्षणार्थी अभियंता – I पदाकरिता १७७ रुपये अर्जशुल्क, प्रकल्प अधिकारी –I आणि प्रकल्प अभियंता- I पदाकरिता ४७२ रुपये अर्जशुल्क आकारण्यात येईल. भारत इलेक्टॉनिक्स लिमिटेड मधील पदभरतीसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.