रोहित पवारांना झापलं! अरे कशाचा संघर्ष. अजितदादांनी केली पोलखोल
02-Dec-2023
Total Views | 141
मुंबई : आयुष्यात कधी संघर्षात केला नाही आता कशाचा संघर्ष? असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची पोलखोल केली. कर्जमध्ये अजित पवार गटाकडून दोन दिवसीय वैचारिक मंथन शिबीर आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी या शिबीराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, "काही काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून फिरायला लागलेत आणि म्हणतात संघर्ष. अरे कशाचा संघर्ष? कधी आयुष्यात संघर्षात केला नाही आता कशाचा संघर्ष?" अशी टीका त्यांनी नाव घेता रोहित पवारांवर केली आहे. आमदार रोहित पवार यांनी पुणे ते नागपुर अशी युवा संघर्ष यात्रा काढली आहे. यावरुनच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्यावर टीका केली.
याशिवाय यावेळी त्यांनी शरद पवारांबद्दलही बरेच खुलासे केले. शपथविधी घेण्याअगोदर आम्ही शरद पवारांना कल्पना दिली होती. तेव्हा त्यांनी आम्हाला तुम्ही सरकारमध्ये जा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असे म्हटले होते, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. तसेच शरद पवार यांची धरसोड वृत्ती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.