केरळमध्ये डाव्यांच्या राजवटीत महिला सुरक्षा वाऱ्यावर; 'फिरदौस'ने ६२ वर्षीय महिलेवर केला बलात्कार

    17-Dec-2023
Total Views |
 Kerala-Rape
 
कोची : आसाममधील फिरदौस नावाच्या एका स्थलांतरित मजुराने केरळमधील एर्नाकुलममध्ये एका ६२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला फेकून दिले. आरोपी फिरदौसला अटक करण्यात आली असून महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १३ डिसेंबर २०२३ बुधवारी घडली.आहे. फिरदौसने अलप्पुझा येथील एका महिलेला मार्ग दाखवण्याच्या बहाण्याने एर्नाकुलम उत्तर रेल्वे स्थानकाच्या दिशेने नेले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.
 
ही महिला रेल्वे स्टेशनवर छोटे-मोठे काम करून आपला उदरनिर्वाह करते. महिलेवर बलात्कार केल्यानंतर फिरदौसने येथून पळ काढला. फिरदौसने बलात्कारादरम्यान महिलेलाही जखमी केले. बराच वेळ ती झुडपात रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. महिलेला अशा अवस्थेत पाहून आजूबाजूच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी फिरदौसला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून फिरदौसला पोलिसांनी अटक केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, फिरदौस गेल्या १० वर्षांपासून केरळमध्ये काम करत आहे. बलात्कारानंतर तो फरार झाला होता, मात्र दोन दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. फिरदौसने महिलेवर ३ तास अत्याचार केला आणि ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये एर्नाकुलममध्ये अशीच एक घटना समोर आली होती जिथे आसाममधील एका स्थलांतरित मजुराने ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. हे मूल एका लाकडी प्लायवूड कारखान्यात काम करणाऱ्या एका स्थलांतरित महिलेचे होते, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता.