महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडलीस का? गौरव म्हणाला “दुखापत झाली म्हणून...”
16-Dec-2023
Total Views | 100
1
मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे सध्या त्याच्या चित्रपटांसाठी अधिक चर्चेत आहे. मात्र, महाराष्ट्राची हास्यजत्रेतुन गौरवने एक्झिट घेतल्याचे म्हटले जात असताना आचा स्वत: गौरवनेच याचा खुलासा केला आहे. भार्गवी चिरमुलेच्या पोडकास्टमध्ये त्याला “तू ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडलीस?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेता म्हणाला, “हा कार्यक्रम मी सोडलेला नाही. माझ्या खांद्याला दुखापत झाली असल्याने मी थोडे दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे,” असे तो म्हणाला.
गौरव मोरे पुढे म्हणाला, “सध्या या दुखापतीमुळे मी दोन ते तीन महिन्यांच्या ब्रेकवर आहे. कारण, एखादं स्किट सादर करताना ओढाताण होते. माझे स्किट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता माहितीच असेल की, माझ्या सगळ्या स्किटमध्ये मारधाड असते. सतत हालचाल केल्यामुळे खांदा अधिक दुखावू शकतो. हेच हास्यजत्रेतून ब्रेक घेण्याचं हेच मूळ कारण आहे. याशिवाय या दरम्यान माझ्या एका सिनेमाचं शूटिंग सुद्धा होतं. त्याच्यासाठी मला ३० ते ३५ दिवसांचा वेळ काढावा लागणार आहे. दुखापत आणि सलग शूटिंग या दोन कारणांमुळे मी काही दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे. तीन महिन्यांचा ब्रेक घेतो असं मी सरांना आधीच सांगून ठेवलंय. खांदा बरा होईपर्यंत आरामच करेन अन्यथा हे दुखणं असंच वाढत जाणार”, असे खरे कारण गौरवने सांगितले. दरम्यान, नुकताच त्याचा ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या आधी तो ‘बॉईज ४’ मध्ये झळकला होता.