बाहेरून लोकं मागवत विकासविरोधी लोकांचा मोर्चा; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
16-Dec-2023
Total Views | 76
मुंबई : धारावीचा विकास नको असल्याने त्यांनी मोर्चा काढला आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर केली आहे. धारावी पुर्नविकास प्रकल्पाविरोधात उबाठा गटाकडून शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता. धारावी ते बीकेसी येथील अदानी उद्योग समूहाच्या कार्यालयापर्यंत शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता.
याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "धारावीच्या मोर्चामध्ये त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रातले लोक बोलवले. त्यांना धारावीचा विकास नको आहे. म्हणून विकासविरोधी लोकांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चात धारावीचे माणसं कमी आहेत आणि सगळी लोकं बाहेरून मागवली आहेत. विकासविरोधी लोकांचं काम महाराष्ट्र बघतो आहे आणि जनता त्यांना नक्कीच जशास तसं उत्तर देईल," असेही ते म्हणाले.